नांदेडराजकीय

Amit Shah ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेडला

नांदेड। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेड शहराच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी या माहितीचे सुतोवाच केले आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून भाजप नांदेड महानगरच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना खा. चव्हाण यांनी या संभाव्य दौर्‍याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी २६ मे रोजी नांदेडच्या भेटीवर येणार आहेत.

या भेटीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जारी झालेला नाही. मात्र, दौऱ्यामध्ये अमित शहा यांचे सार्वजनिक कार्यक्रम असतील, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच नांदेडला येणार असून, या दौऱ्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने पूर्वतयारीला सुरुवात केल्याचे दिसून येते आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button