क्राईमनांदेड

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

कुण्यातरी कारणांमुळे कुणीतरी अज्ञाताने मारहाण केल्याचा संशय

सोनारी फाटा, शेख खय्युम। तालुक्यातील मौजे करंजी ते सरसम बु पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे, तात्काळ पोलिसांनी त्यास हिमायतनगर येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविले आहे. गंभीर जखमी युवक हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले असून, आशिष साईनाथ जाधव वय 28 रा असे युवकाचे नाव आहे. (in-himayatnagar-taluka-youths-are-seriously-injured-in-a-bloodbath-on-the-national-highway-the-youth-was-shifted-to-nanded)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर-भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम ते करंजी मधोमध असलेल्या पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस पोचली असून, घटनास्थळ पंचनामा करून पाहणी केली असता दुचाकी, चपला व हाथोडी आढळून आली असून, कुणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी कारणास्तव मारहाण केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

IMG 20240612 WA0009 हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

ही घटना मध्यरात्रीला घडली असल्याचे दिसत असून, या घटनेचा तपास नांदेड ग्रामीण येथून आलेले प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल भगत, सरसम बिटचे जमादार कदम हे करत आहेत. ही घटना कुण्या कारणाने झाली व का झाली..? या बाबत घटनास्थळी उपस्थित नागरिकांतून चर्चा केली जाते आहे. दरम्यान पोलिसांना संपर्क साधला असता पोलीस म्हणाले की, जखमी युवकाला प्राथमिक उपचार करून नांदेडला हलविले आहे. त्याची प्रकृती बरी झाल्यानंतर दिलेल्या जबाबानंतर ही घटना कशामुळे घडली याचा खुलासा होणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!