हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL
सोनारी फाटा, शेख खय्युम। तालुक्यातील मौजे करंजी ते सरसम बु पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे, तात्काळ पोलिसांनी त्यास हिमायतनगर येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविले आहे. गंभीर जखमी युवक हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले असून, आशिष साईनाथ जाधव वय 28 रा असे युवकाचे नाव आहे. (in-himayatnagar-taluka-youths-are-seriously-injured-in-a-bloodbath-on-the-national-highway-the-youth-was-shifted-to-nanded)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर-भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम ते करंजी मधोमध असलेल्या पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस पोचली असून, घटनास्थळ पंचनामा करून पाहणी केली असता दुचाकी, चपला व हाथोडी आढळून आली असून, कुणीतरी अज्ञाता...
