नागपूरमहाराष्ट्रमुंबई

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर| राज्यातील गुटखा बंदी अधिक प्रभावी आणि कठोर करण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून गुटखा व्यवसायावर आता मकोका लावता यावा यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री आणि वहनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन घटकांची पूर्तता नसल्याने तो लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा तरतुदी करण्यात येणार आहेत. यानंतर हा कायदा अधिक कठोर स्वरूपात लागू केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाई
राज्यात गुटखा विक्री आणि वहनावर बंदी असून पोलिसांकडून सतत मोहीम राबवली जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये—
नवी मुंबई : 1,144
अहिल्यानगर : 185
जालना : 90
अकोला : 35
नाशिक : 131
चंद्रपूर : 230
सोलापूर : 108
बुलढाणा : 664
नागपूर व यवतमाळ : 1,706
अशा मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

100 मीटर परिसरात संयुक्त कारवाईचे आदेश
शाळा आणि महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्री होत असल्यास त्या परिसरातील टपऱ्या आणि दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या कारवाया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केल्या जाणार आहेत.

ड्रग व्यसनमुक्तीसाठी दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची गरज
मुंबई महानगर प्रदेशात दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असल्याने सरकार यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील गुटखा बंदी अधिक कठोर करण्याकडे सरकारकडून स्पष्ट धोरणात्मक पावले उचलली जात असून कायद्यातील सुधारणा लवकरच करण्यात येणार आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!