नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संचालित शिवाजी विद्यालय,सिडको,नांदेड या शाळेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख एस.आर.बीरगे, बी.जी.हंबर्डे, ए.एन.कंकरे, एन.पी.जाधव,सौ.व्ही.यु.भाले हे होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थीनींनी ‘बसंती हवा’ हे गीत सादर केले.

यावेळी स्नेहा कदम,गीतांजली कोटेवाड,समीक्षा मस्के,शिवानी चल्लावार,सिद्धि मामीडवार,दिंडे अनुजा व दत्तात्रय कुलकर्णी या शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले तर हिंदी विषयाचे सहशिक्षक एस.आर.बीरगे यांनी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की हिंदी ही भारताची ओळख आणि अभिमान आहे.ही भारताची अधिकृत भाषा आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी हे सर्वोत्तम माध्यम आहे.दक्षिण पॅसिफिक महासागरात फिजी नावाचा एक बेट देश आहे जिथे हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.


भारताव्यतिरिक्त फिलीपिन्स, मॉरिशस,फिजी, नेपाळ, सुरीनाम, गयाना, त्रिनिदाद, तिबेट आणि पाकिस्तान मध्ये हिंदी बोलली आणि समजली जाते.त्यांनी हिंदी भाषेला देण्यात आलेल्या राष्ट्रभाषेच्या दर्जा विषयी माहिती देत हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केलेकेले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. जाधव तर आभार ए.एन.कंकरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन सुरेवाड,नामदेव कोनापुरे व राम विजापुरे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


