Homeक्राईमPolice action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले;...

Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

नांदेड। पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकानी व पोलीस स्टेशन उमरीचे अधिकारी अंमलदार यांनी संशयित राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक किमंती अंदाजे ४५,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात घेतला आहे, या कार्यवाही मूळ उमरी परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच उमरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली.

IMG 20240915 095800 Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

उमरी तळेगाव रोडवरुन एक आयचर ट्रक क्र. MH-२६ BE ७३३७ मध्ये संशयित राशेनचे गव्हाचे कट्टे किमंती अंदाजे ४,००,०००/- रुपये व ट्रक क्र.MH-२६ BE ७८३५ ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे असलेला किमंती अंदाजे १,००,०००/-रुपये व दोन्ही वाहनाची किमत मिळून ४०,००,०००/- रुपये असा एकुण ४५,००,०००/- रुपयाचा संशयित माल मिळुन आल्यांने सदर दोन्ही वाहने ताब्यात घेऊन उमरी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागास पत्रव्यवहार करुन, अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.

IMG 20240915 WA0017 Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, प्रशांत संपते, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोउपनि बी.एम. हालशे, पो.कॉ.पी.एम. जुन्ने, एम.बी. कांबळे, बी.डी. लामतुरे, आर. के. मुळे, महाचंद्रमुणी कांबळे आणि पोलीस स्टेशन उमरी येथील अंकुश माने, सपोनि, सचिन अरमळ, पोउपनि, पोहेकॉ बी.एम. जाधव, टी. व्ही. केंद्रे पो.कॉ. आर.पी.जाधव, ए.व्ही हैबतकर, अब्दुल रियाज, सय्यद अजमल, दत्तात्र्य गुरुपवार यांनी पार पाडुन चांगली कामगिरी केली आहे. वरीष्ठानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments