नांदेड़| कु. स्वरा राजेश गाजुलवाड हीने धुळे येथे झालेल्या14 वर्षे खालील वयोगटातुन राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेलाअसून तिने मिळविलेल्या या यशा बदल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
कु. स्वरा राजेश गाजुलवाड हीने प्रथम जिल्हा पातळीवरील कराटे स्पर्धामध्ये विजय संपादन करुन दि 25 नोंव्हेबर 2024 रोजी नांदेड येथील स्टेडीयम झालेल्या विभागीय स्पर्धामध्ये यश संपादन करुन लातूर विभागातून तीची 14 वर्षाखालील वयोगटामध्ये राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये निवड झालेली होती.
दिनांक 29 नोंव्हेबर 2024 रोजी धुळे येथे राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये तीच्या 14 वर्षाखालील वयोगटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून राज्य शासनाकडून खेळाडूंना असणा-या 5 टक्के राखीव जागेच्या लाभाचे प्रमाणपत्र प्राप्त केले. या यशाबदल तीचे व कराटे किडस क्लब नांदेडचे प्रशिक्षक आकाश भोरे यांचे अभिनंदन होत आहे