नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध विभागांतील संचिका व मुळ दस्त ऐवज भंडार कक्ष नसल्याने ईतरत्र तर अनेक विभागांत धुळ खात पडले असुन प्रशासनाने तात्काळ भंडार कक्ष उपलब्ध करून संबंधित दस्तऐवज ठेवून जतन करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून भंडार कक्ष उपलब्ध नसल्याने नाव परिवर्तन, जन्म मृत्यू, मालमत्ता कर,यासह विविध विभागांच्या अनेक संचिका व मुळ दस्त ऐवज व कागदपत्रे , मालमत्ता कर संदर्भात असलेले रजिस्टर, पावती बुके,व ईतर अनेक महत्वाची कागदपत्रे ईतरत्र विभागात विखुरलेल्या अवस्थेत तर काही विभागातील शौचालय मध्ये अस्त व्यस्त अवस्थेत पडलेली आहेत.
संबंधित मालमत्ता धारक व नागरीकांना माहिती किंवा कागदपत्रे पाहिजे असल्यास अनेकांना उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते तर अनेकांना संचिका नाहीत कळविल्या जात आहेत. कार्यालय अंतर्गत दोन प्रभागासह वसरणी,कौठा,असदवन, असरजन, वाघाळा यासह सिडको हडको परिसरातील भागाच्या समावेश असुन अनेक महत्त्वाच्ये कागदपत्रे, संचिका या ईतरत्र असल्याने तात्काळ प्रशासनाने भंडार कक्ष उपलब्ध करून संचिका सह महत्व पुर्ण कागदपत्रे जतन करावी अशी मागणी होत आहे.