नांदेड| उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इतवारा गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा किंमती 7 लक्ष 92 हजार रुपये व पिकअप वाहन किंमती 7 लक्ष 50 हजार रुपये असा एकुण 15 लक्ष 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात नांदेड ग्रामीण पोलीस थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंदयाची माहीती काढुन अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पो. स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, मुदखेड कडुन नांदेड कडे पिकअप वाहन क्र. MH-26 CH – 1286 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा घेवुन येत आहे.
त्यावरून पोलीस स्टेशन नांदेड हद्दीत दिनांक 30/11/2024 रोजी 13.40 ते 14.15 वाजता शिवाजी उबाळे यांचे पानटपरी जवळ रोडवर, गाडेगाव ता. जि. नांदेड येथे पिकअप वाहन क्र. MH-26 CH – 1286 गाडी ताब्यात घेवुन तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास सुगंधीत गुटखा किंमती 6,33,600/- रु, ZI-01 कंपणीचा जाफराणी जर्दा किंमती 1,58,400/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून पोलिसांनी पिकअप वाहन क्र. MH-26 CH-1286 किमती 7,50,000/- रु असा एकुण किंमती 15,42,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांनतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा किंमती 7 लक्ष 92 हजार रुपये व पिकअप वाहन किंमती 7 लक्ष 50 हजार रुपये असा एकुण 15 लक्ष 42,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात केल्याप्रकरणी गु.र.नं. 1116/2024 कलम 123, 223, 274, 275, 3 (5) BNS सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26 (2), 27, 23, कलम 30 (2) (A) चे उल्लघन कलम 59 (iv) प्रमाणे आरोपी सय्यद जावेद पिकअप चालक, रफीक सेठ रा. हिमायतनगर, सय्यद अमीर सय्यद खामर रा. हिमायतनगर, शेख आजमोद्दीन ऊर्फ बबलु गुटखेवाला रा. मुदखेड यांच्यावर पोलीस नायक अर्जुन केशव मुंडे नांदेड ग्रामीण सलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे शोध पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड , सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पोना अर्जुन मुंडे, पोना मोहम्मद गौस, पोकों श्रीराम दासरे सर्व नेमणुक पो.स्टे नांदेड ग्रामीण सलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा यांनी कार्यवाही केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड ने. पो. स्टे. नांदेड ग्रामीण हे करीत आहेत.