करियरनांदेड

Chandraprakash Deglurkar : चर्मकार समाजातर्फे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा ओबीसी मित्र पुरस्काराबद्दल सत्कार

नांदेड| भारतीय पिछडा शोषित संगठन व ओबीसी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना ओबीसी मित्र पुरस्कार रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी विसावा हाॅटेल नांदेड येथे प्रदान करण्यात आला. याबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त (छ. संभाजीनगर) व चर्मकार समाज भूषण बालाजीराव सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या व्यापक बैठकीत हा भव्य सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी विठ्ठलराव कांबळे हे होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे यांनी या बैठकीचे संयोजन केले होते. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व्यंकटराव उतकर, अशोक लाठकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरे, जमनाजी डोंगरे, शिवानंद जोगदंड, नरसिंग सुर्यवंशी, शिवाजी सोनटक्के, नागनाथ सुर्यतळे, श्रीराम गोरे, गंगाधर सोनटक्के, आस्तिक कोरडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button