HomeनांदेडSecurity guards ; सुरक्षा रक्षक नसल्याने मनपा‌ क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे कार्यालय रामभरोसे...

Security guards ; सुरक्षा रक्षक नसल्याने मनपा‌ क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे कार्यालय रामभरोसे -NNL

नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा‌ आरोग्य केंद्र येथे एकच ईमारती मध्ये दोन कार्यालय असल्याने या ठिकाणी सुरक्षा‌ रक्षक नसल्याने व रात्रपाळी साठी कर्मचारी नियुक्ती अभावी एकाच इमारतीत असलेल्या दोन कार्यालय सुरक्षा‌ रामभरोसे झाली असून तात्काळ सुरक्षा‌ रक्षक नेमणूक करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.

नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा‌ आरोग्य केंद्र हे दोन कार्यालय एकाच इमारतीत असल्याने दैनंदिन नागरिक व‌ रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही कार्यालय अंतर्गत संगणक सह व ईतर यंत्र सामुग्री यांच्या सह दस्त ऐवज, संचिका व‌ औषधी साठा मुबलक प्रमाणात आहे,तर अनेक संचिका गत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आहेत.

या ठिकाणी या पुर्वी दोन सुरक्षा‌रक्षक‌ यासह रात्री पाळी कर्मचारी कार्यरत होते मात्र गेल्या अनेक महिन्यांपूर्वी येथील सुरक्षा रक्षक या ठिकाणी काढून टाकल्याने सुरक्षा‌ रामभरोसे झाली आहे.मोठ्या प्रमाणात होणारी वर्दळ, नागरीक येजा यासह मातृसेवा‌ आरोग्य केंद्र येथे लसीकरण व‌ दैनंदिन रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दैनंदिन चौवीस तासांसाठी सुरक्षा रक्षक नेमणूक करणे अपेक्षित आहे.प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments