नांदेड। शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी नांदेड शहरातील अॅटो रिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्या बाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबविण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने सदर मोहीम आज दिनांक 18/12/2024 रोजी नांदेड शहरातील अॅटोरिक्षाचे सर्व कागदपत्रे त्यामध्ये इंन्शुरन्स, वाहनाचे फिटनेस सर्टिफीकेट, अॅटोचे परमीट व अॅटो चालविण्याचा परवाना (लायसन्सं) विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहीम मध्ये अॅटोरिक्षाचे परमीट संपलेले व इतर कागदपत्र तपासणी करुण अपूर्ण असल्याने कागपत्र व युनिफॉर्म परिधान न केलेले असे एकूण 135 अॅटो चालका विरुध्द केसेस करुण त्यांचे वर इ चालन द्वारे 2,39,500/ रु दंड लावण्यात आला आहे. तसेच मागील प्रलंबित असलेल्या 44 केसेसचा एकूण 26700 रु दंड वाहन धारका कडूण वसुल करण्यात आला आहे.
तसेच इतवारा शहर वाहतुक शाखा तर्फे 38 वाहन धारकावर कार्यवाही करुण 36,500/रु इ चालन द्वारो दंड लावण्यात आला आहे. पो.नि पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांनी अॅटोरिक्षाचे कागदपत्र तपासणी दरम्यान 70 अॅटोरिक्षाचे कागदपत्र अपूर्ण असल्याने पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे लावण्यात आले आहेत.
सदर मोहीम मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थीतीत राबविण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सदरची मोहीम मा. सहा. पोलीस अधिक्षक, नांदेड शहर श्रीमती किर्तीका मॅडम व उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा सुशीलकुमार नायक साहेब यांचे उपस्थितीत घेण्यात आली असुन सदर मोहीम मध्ये शहर वाहतुक शाखा इतवारा येथील श्री जगन पवार, पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथील पो. नि. श्री ओमकांत चिंचोलकर, श.वा.शा. वजिराबाद येथील पो.नि. श्री गुट्टे, पोउपनि श्री कुलकर्णी, पो.उप.नि. श्री कोटतीर्थवाले शहर वाहतुक शाखा, ट्राफीक अंमलदार असे हजर होते.
आज रोजी शहर वाहतुक शाखा इतवारा, वजिराबाद व पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे विशेष मोहीम राबवुन एकुण 173 अॅटोरिक्षावर कार्यवाही करुण 2,76,000/रु दंड लावण्यात आला आहे. तसेच 44 केसेसचा एकुण 26700 रु दंड वाहन धारका कडुण वसुल करण्यात आला असून 70 अॅटोरिक्षाचे कागदपत्र अपूर्ण असल्याने पो. स्टे नांदेड ग्रामीण येथे लावण्यात आलेले आहेत.
नांदेड शहरातील अॅटोरिक्षा चालक/मालक यांना कळविण्यात येते की, सदरची मोहीम हि या पुढे पण चालू राहणार आहे. तरी सदरची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी अॅटोचालक/मालक यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.