Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

हदगाव। मोहम्मद पैगंबर व गणेश विसर्जन हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम योगायोगाणे दोन दिवसानी आल्यामुळे प्रशासनाला अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

हदगाव शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोहम्मद पैगंबराचा वाढदिवसानिमित्त मिलादुनबीचा कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी होता. परंतु गणपती विसर्जन दिनांक 17 सप्टेंबर रोजी असल्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने हदगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये दि 16 सप्टेंबर रोजी असलेला ईद-ए-मिलादू नबीचा कार्यक्रम 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी घेण्याचे ठरविले आहे.

यामुळे दोन्ही समाजात ऐक्य व शांतता दृष्टीने हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी असे आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी हदगाव तहसीलदार हदगाव व हदगाव पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात दिले आहे. या निवेदनावर ईद-ए-मिलादुन्नबीचे अध्यक्ष मो असिफ मो हरुन भुरा, अनवर खाँन हमीद खान, शे बशीर शे मूर्तजा, यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त अनवर खान यांनी महत्वाची भुमिका निभवली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button