Homeनांदेडशिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन...

शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील शिवणी येथील श्रीकृष्ण मंदिरात आज सोमवार दि.२६ आगस्ट व उद्या मंगळवार २७ आगस्ट असे एकूण दोन दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हभप जनकिराम महाराज कंधारकर यांचे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन व महाप्रसादाचे कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवार दि.२६ आगस्ट रोजी शिवणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरात रात्री ८ वाजेपासून ११ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर २६ रोजी रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

IMG 20240825 WA0040 शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांचे गोपाळकाला काल्याच्या कीर्तनाचे आयोजन आहे.तर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजिले आहे.करिता शिवणी आप्पारावपेठ इस्लापूर भागातील भाविकांनी या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे श्रीकृष्ण मंदिर शिवणी व्यवस्थापक मंडळी व शिवणी गावकऱ्यांच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments