कृषीनांदेड

Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यासह इतर तालुक्यात अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी,त्याच बरोबर हिवळणी येथील मयत शेतकरी विलास राठोड यांच्या कुंटूबाला तात्काळ अर्थीक मदत करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे केली आहे.

माहूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्ठीने कहर केला आहे.झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशास्थितीत शासनाने सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवासेनाचे जिल्हाप्रमुख अॅड. यश खराटे यांनी केली आहे. पावसाने कहर केल्याने पिकांची अवस्था विदारक झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्व पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्याच बरोबर माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील तरुण शेतकर्‍यारी विलास धारासिंग राठोड वय (३१) याचा व एका बैलाचा विद्युत शाॅक लागून जागीच अंत झाला असून विलास च्या कूंटूबांला शासनाने तात्काळ मंदत कारावी,तसेच नुकसान ग्रस्त शेतकर्‍याच्या पिकांचे पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button