HomeनांदेडCataclysm-Free Maharashtra : "मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र" अभियान - जनतेपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री...

Cataclysm-Free Maharashtra : “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियान – जनतेपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड| “मोतीबिंदू हा दुर्लक्षित राहिल्यास अंधत्वास कारणीभूत ठरतो. त्याच्या वेळीच निदान व उपचारासाठी नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मा. अतुल सावे यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हा रुग्णालयात त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या विशेष मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोशना आरा तडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ. एच. साखरे, डॉ. गायकवाड तसेच सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या मोहिमेदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून प्रत्यक्ष गृह भेट व रुग्णालयात येणाऱ्या 40 वर्षाच्या वरील नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदूच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. या सर्व रुग्णांची जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. समाजातील एकही व्यक्ती मोतीबिंदू मुळे अंध होणार नाही याची खबरदारी घेवून “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या संकल्पनेला पूर्ण करण्याचे आवाहनही पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. याबाबत योग्य ती खबरदारी जिल्हा प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचवा पालकमंत्री अतुल सावे 3 Cataclysm-Free Maharashtra : "मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र" अभियान - जनतेपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री अतुल सावे

या अभियानासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये आशा कार्यकर्ती, एमपीडब्लु, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत मोतीबिंदूचे रुग्ण गाव, वस्ती, वाडी पातळीवरून शोधून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सोबतच जन्मतःच मोतीबिंदू असणाऱ्या बालकांचे शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. म्हणून त्यासाठी लागणारे नव-नविन तंत्रज्ञान (फॅको मशीन्स हे उच्च दर्जाची उपकरणे (सुक्ष्मदर्शक यंत्रणा ), ए-स्कॅन बायोमीटर मशीन शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचवा पालकमंत्री अतुल सावे 2 Cataclysm-Free Maharashtra : "मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र" अभियान - जनतेपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री अतुल सावे

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड डॉ. संगीता देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोशना आरा तडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ. एच. साखरे, डॉ. गायकवाड तसेच इतर सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments