Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्यांना व मयत शेतकर्याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यासह इतर तालुक्यात अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी,त्याच बरोबर हिवळणी येथील मयत शेतकरी विलास राठोड यांच्या कुंटूबाला तात्काळ अर्थीक मदत करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे केली आहे.
माहूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्ठीने कहर केला आहे.झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशास्थितीत शासनाने सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवासेनाचे जिल्हाप्रमुख अॅड. यश खराटे यांनी केली आहे. पावसाने कहर केल्याने पिकांची अवस्था विदारक झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्व पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्याच बरोबर माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथ...
