Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १५ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
धार्मिक नांदेड लेख July 17, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १५ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

NNL TeamBy NNL TeamJuly 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

यात्रेचे अखेरचे क्षण… स्मरणरंजनाचा सोहळा
अमरनाथ यात्रेचे शेवटचे दोन दिवस उजाडले होते. पहाटे तीनला वेक-अप कॉल… पण हॉटेल ‘नय्यर’ मधील विश्रांतीमुळे उठायला कोणालाही आळस वाटला नाही. प्रत्येकाने ₹२०० देऊन ऑटो केले, आणि वेळेत पोहोचलो अमृतसर रेल्वे स्थानकावर. पावणे पाचला शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली. रेल्वेने दिलेला नाश्ता नुकताच संपला, इतक्यात लुधियानात कुलदीपसिंह सरदारजीने छोले-कुलचे प्रेमाने भरवले. त्यांचा आग्रह नाकारणं अशक्यच होतं!

दिल्ली – उकाड्यातून थेट आदरातिथ्याच्या सजीव छायेत!
सकाळी अकरा वाजता पोहोचलो दिल्लीला… प्लॅटफॉर्म १ वर उतरून, १६ वर असलेल्या पार्किंगपर्यंत पोहोचणं म्हणजे सामानाच्या युद्धात उतरणं! हमालांचे दर गगनाला भिडले, पण राजूभाऊंच्या हुशारीने “नाटक केले – बॅग उचलण्याचे” आणि दर गडगडले! वरुणराजाची कृपा झाली – पावसाच्या सरी कोसळल्या आणि दिल्लीचं वातावरण सुखावलं. लाल किल्ला, इंडिया गेट, राजघाट, त्रिमूर्ती भवन, पंतप्रधान निवास… इतिहासाचे हुंकार आणि वर्तमानाचं वैभव यांचा मिलाफ अनुभवला.

खा. गोपछडे यांचं ‘दिल्लीतील स्वागतसत्कार’
दुपारी आमचं भोजन होतं गुजरात भवनात – खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या सौजन्याने संजीवकुमार अधिकारी स्वतः स्वागतासाठी उभे होते. दिल्लीकर महिलांनी यात्रेकरूंना हळदी-कुंकवाने सन्मानित केलं. अवतारसिंह जी, अजितसिंह जी, वेणू गोपालजी, ओशो कालिया आणि अनेक मान्यवरांनी सिरोपाव घालून स्वागत केलं. खा. गोपछडे यांनी मोबाईल संवादात म्हटलं दिलीपभाऊंच्या २५व्या यात्रेत सहभागी होणं, ही आमची आध्यात्मिक सेवा आहे.” त्यानंतर सामूहिक प्रार्थना आणि भजनांनी वातावरण अधिक भाविक आणि भक्तिरसात न्हालं.

राष्ट्रपती भवन – सत्तेच्या हृदयाशी भेट
माझा मित्र सिकंदर, खासदारांचा ड्रायव्हर, भेटायला आला. त्याच्या प्रयत्नांनी आम्हाला VIP पासेसवर राष्ट्रपती भवन दर्शन लाभलं! ३२० एकरांचं हे भव्य वास्तूशिल्प, ३४० खोल्या, मोगल गार्डन आणि ऐतिहासिक गौरव घेऊन समोर उभं होतं. भारताच्या राष्ट्रध्वजासारखंच याचं वैभव डोळ्यात भरून आलं!

कुतुबमिनार – इतिहासाचा साक्षात साक्षीदार
पुढचा टप्पा – कुतुबमिनार प्रत्येकी ₹४० देऊन प्रवेश केला. ११९९ ते १३६८ दरम्यान उभारलेला हा विजय बुरूज, ३९९ पायऱ्यांनी सजलेला, इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. शिलालेख, भौमितिक नक्षीकाम, तुघलकांची रचना… हे सर्व पाहताना इतिहासाला स्पर्श केल्यासारखं वाटलं.

परतीचा प्रवास – आठवणींचा गाठोडा
रात्री ८:३० ला निजामुद्दीन स्टेशन गाठलं.प्रसिद्ध हास्यकवी प्रताप फौजदार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रुचकर भोजनाची मेजवानी!मुकेश चिकारा यांनी स्वादिष्ट जेवण दिलं, त्यांचा सत्कार ट्रॉफी देऊन करण्यात आला. रात्र झाली… ११ वाजता मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसने आम्ही पुन्हा नांदेडकडे रवाना झालो… (क्रमश 🙂

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave – Part 15
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये एक जनावर दगावलं
Next Article Ardhapur case : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Savargaon (N.) : सावरगाव (न.) मुलाची आत्महत्या त्यानंतर वडिलांचा मृत्यू ; त्या कुटुंबियांचे आ चिखलीकरांकडून सांत्वन

June 22, 2025

flood-affected areas : देगलूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी न केल्याने पालकमंत्र्यांचा निषेध

August 31, 2025

Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL

July 27, 2024

self-safety and legal guidance : नांदेड पोलीस दलातर्फे “मिशन निर्भया” अंतर्गत शालेय विदयार्थ्याना स्वसुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

June 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Babasaheb Patil ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

Awareness workshop : नांदेड येथे करण्यात आले जागरूकता कार्यशाळेचे आयोजन

Ndcc bank building inuguretion ; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न -NNL

Health check-up ; मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे मनपाच्या साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांच्यी आरोग्य तपासणी.. – NNL

भाजयुमो शहराध्यक्ष पदी अविनाश पाटील ;व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बिडवई -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?