Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
नांदेड लेख July 3, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

"हिमालयाच्या कुशीत, श्रद्धेच्या शिखरावर…"
NNL TeamBy NNL TeamJuly 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

वाचक मित्रांनो…! अतिशय खडतर, थरारक व अध्यात्मिक रोमांच असलेली अमरनाथ यात्रा यंदाही नव्या जोमात सुरू होत आहे. नांदेड येथून सलग २५ व्या वर्षी, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर ९३ यात्रेकरूंसह बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत. काश्मीरमधील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, आणि अनपेक्षित अडथळ्यांवर मात करत घडणाऱ्या या यात्रेचा थरारक प्रवास, दिलीपभाऊंच्या ओघवत्या, प्रत्ययकारी शैलीतून रोजच्या अंकात साकारला जाणार आहे. त्यामुळे, आज पासून छापून येत असलेली “अमरनाथच्या गुहेतून” ही लेखमाला सेवा करून ठेवा! एकदा वाचल्यावर विसरणार नाही, असा हा अनुभव वाचकांच्या मनात खोलवर ठसे उमटवणार आहे – संपादक

शुद्ध बर्फाच्या कणांतून झळाळणारा देवाचा श्वास, अनंत हिमशिखरांतून उमटणारी ओंकाराची ध्वनी… याच निसर्गाच्या गोदेत वसलेली आहे बर्फानी बाबांची गुहा – अमरनाथ! आणि त्या दिशेने होणारी ही यात्रा म्हणजे केवळ पायी चालण्याची वाट नव्हे, ती आहे आत्म्याच्या अंतर्गत प्रवासाची! यंदा सलग 25 व्या वर्षी आम्ही पुन्हा सज्ज झालो होतो.सिल्वर ज्यूबली होत असल्यामुळे रोमांचित होत होतो.वृत्तपत्रं, सोशल मीडियावर घोषणा झळकल्या आणि अवघ्या सात दिवसांत यात्रेचा कोटा पूर्ण झाला!गेल्या वर्षी प्रमाणे माझा लहान भाऊ राजेशसिंह पुढे आला आणि साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर उचलल्या.या वर्षीच्या मेडिकल सर्टिफिकेट साठी सिव्हिल सर्जन डॉ.पेरके, त्यांचे स्वीय सहाय्यक शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे आणि सेवक शंकर यांनी अतुलनीय सहकार्य केले. पंजाब नॅशनल बँकेतील माझा मित्र शिवराज याने कनेक्टिव्हिटीच्या अडचणीतही चिकाटी सोडली नाही, आणि रजिस्ट्रेशनचा तो कठीण अध्याय अखेर पूर्णत्वास गेला.

यात्रेची पूर्वतयारी – मन आणि शरीर यांचा यज्ञ
ही यात्रा म्हणजे केवळ डोंगर चढण्याची तयारी नव्हे, ती आहे भक्तीने मन शुद्ध होण्याची प्रक्रिया. भारत भरातून लाखो भाविक दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात.पण अशी नियोजित, शिस्तबद्ध आणि श्रद्धापूर्वक तयारी संपूर्ण देशात केवळ नांदेडच्या अमरनाथ यात्री संघातच पाहायला मिळते असे अनेकजण आवर्जून सांगत असतात.सकाळी सहा वाजता श्रीराम सेतूवर जमणं, दोन-तीन फेऱ्या मारत सहा किलोमीटर वॉकिंग, त्यानंतर प्राणायाम – भसरिका, ओंकार लहरी, कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी…प्रत्येक श्वासात बर्फानी बाबाचे स्मरण, आणि प्रत्येक टाळीत भक्तीचा घोष. यानंतर सुरू होतो सेल्फ हिप्नोतिझम – स्वतःला दिलेल्या प्रेरणादायी सूचना, आणि मग टाळ्यांचा जोरदार गजर…हसत-हसत नवे बंध तयार होतात.कोणी गाणं तर कोणी भजन म्हणतो, एखादा विनोद सांगतो, मीही रोज एक मजेशीर किस्सा सांगतो.

हे हास्यच यात्रेच्या आधीचे मानसिक बल बनते!
काहीजण म्हणतात, “आम्ही आमच्या घराजवळ चालतो.”माझं त्यांना एकच म्हणणं – एकदा या, आणि नंतर ‘नियमित ’ कधी झालात ते कळणारही नाही. इथं येणाऱ्यांमध्ये एक वेगळीच ऊब असते. संवादातून आपुलकी निर्माण होते, आणि ‘भक्तांचा परिवार’ तयार होतो.योग दिन, चालण्याच्या स्पर्धा, रत्नेश्वरी पावसाची दिंडी या साऱ्या गोष्टी एकमेकांच्या सहवासात चैतन्य निर्माण करतात.प्रत्येक पावलांतून बाबांच्या चरणाशी जवळ जाण्याची अनुभूती येते.नंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे रेल्वे तिकिटे काढणे ही भक्तीची दुसरीच परीक्षा ! आधी 120 दिवसापूर्वी तिकीटे आरक्षित करता येत होती. आता नियमात बदल झाल्यामुळे 60 दिवस आधी तिकिटाचा कोटा उघडतो.या मुळे आमच्या सारखे जी पूर्वनियोजन करतात त्यांचे नुकसान होत आहे. आता कोटा ओपन झाला की अर्धा तासात संपतो. त्यामुळे अतिशय दक्ष रहावे लागते. वेटिंग लागलं की ब्रेक जर्नी, मग तात्काळ, त्यानंतर कोट्यांमधून शोधाशोध…विमानाने येणाऱ्या यात्रेकरूंनाही योग्य मार्गदर्शन हवे – आणि या साऱ्यासाठी दिवस कधी संपतात, ते जाणवतही नाही.

अन्नदान – यात्रेतील पवित्र अर्पण
या यात्रेत कोणत्याही यात्रेकरूकडून भोजनासाठी एक रुपयाही शुल्क घेतला जात नाही.भक्तांनी भक्तांसाठी सुरू केलेली ही व्यवस्था म्हणजेच खऱ्या अर्थाने अन्नयज्ञ! यावर्षी अन्नदानासाठी पुढाकार घेतलेले माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण साहेब, खा. डॉ. अजित गोपछडे साहेब ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सतीश सुगनचंदजी शर्मा. सुभाष बंग,श्याम हुरणे, डॉ. अजयसिंह ठाकूर, द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल,ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सुभाष बंग ,सरदार जागीरसिंह अमृतसर,हास्य कवी प्रताप फौंजदार, दत्ता खानजोडे, प्रदीप शुक्ला भोपाळ, चंद्रकांत अप्पाराव कदम, भुसावळचे ऍड.निर्मल दायमा,बापू कदम व संभाजीनगरच्या कृष्णा कदम, या सेवाभावी व्यक्तींनी. यांच्या हातून अन्न नव्हे तर श्रद्धा वाटली गेली.दरवर्षी प्रमाणे सदानंद मेडेवार यांच्या पुढाकारातून केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनेने अलोपॅथी मेडिसिन चा पुरवठा केला. लक्ष्मीकांत लोकमनवार यांनी आयुर्वेदिक औषधी दिल्या.

नियोजन, सौंदर्य आणि सजावट – भक्तीला साजेसे रूप
24 वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याची धडपड असते.हॉटेल चालक, बसवाले, स्थानिक यांच्याशी सुसंवादाने आता जवळीकच झाली आहे.यंदा मरून कलरचे टी-शर्ट, रेनकोट, कॅप्स देण्यात आले.बसमधील आसन व्यवस्था, आयकार्ड, ट्रॉफी, बॅनर, ही सर्व ‘छोटी’ वाटणारी कामं एकत्रित केली तर एक भव्य सोहळा तयार होतो.सर्व तिकीटं, यात्रा परच्यांची एकदा पुन्हा खातरजमा केली… आणि आता, उद्या शुक्रवार – पहाटे पहिलं पाऊल बर्फानी बाबांच्या दिशेने पडणार ! त्या रात्री झोपेच्या अधीन होताना एकच विचार मनात घोळत होता – “बाबांचे दर्शन मिळेल, हा थकवा सारा निवेल…”                          (क्रमशः)   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave – Part 1
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmers : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी चिंता
Next Article Jahagirdar : आवाज मराठीचा जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – जहागीरदार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

August 19, 2024

Sangh’s grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

October 2, 2025

From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

July 19, 2024

the women warned of locking the Sarasam Gram Panchayat on January 26 : अन्यथा २६ जानेवारी रोजी सरसम ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा महिलांनी दिला इशारा – NNL

December 26, 2024
Advertisement
टॉप बातम्या

कोणत्याही माता भगिनीला अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन – आ.संतोष बांगर -NNL

the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

Union Cabinet approves : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Prateek Sonawane ; प्रतीक सोनवणे अमेरिकेत एम.एस. मास्टर्स डिग्रीने सन्मानित

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?