Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
वाचक मित्रांनो...! अतिशय खडतर, थरारक व अध्यात्मिक रोमांच असलेली अमरनाथ यात्रा यंदाही नव्या जोमात सुरू होत आहे. नांदेड येथून सलग २५ व्या वर्षी, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर ९३ यात्रेकरूंसह बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत. काश्मीरमधील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, आणि अनपेक्षित अडथळ्यांवर मात करत घडणाऱ्या या यात्रेचा थरारक प्रवास, दिलीपभाऊंच्या ओघवत्या, प्रत्ययकारी शैलीतून रोजच्या अंकात साकारला जाणार आहे. त्यामुळे, आज पासून छापून येत असलेली "अमरनाथच्या गुहेतून" ही लेखमाला सेवा करून ठेवा! एकदा वाचल्यावर विसरणार नाही, असा हा अनुभव वाचकांच्या मनात खोलवर ठसे उमटवणार आहे – संपादक
शुद्ध बर्फाच्या कणांतून झळाळणारा देवाचा श्वास, अनंत हिमशिखरांतून उमटणारी ओंकाराची ध्वनी… याच निसर्गाच्या गोदेत वसलेली आहे बर्फानी बाबांची गुहा – अमरनाथ! आणि त्या दिशेने होणारी ही यात्र...
