Hind di chadar : हिंद दी चादरचा संदेश वाडी–तांड्यापर्यंत; आशिष सकवान यांचा तालुकाभर जनजागृती दौरा

हिमायतनगर (अनिल मादसवार) ‘हिंद दी चादर’ – धर्म, त्याग आणि बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील वाडी–तांड्यांवर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक तथा बंजारा समाजाचे समाजभूषण आशिष सकवान यांनी तालुक्यातील लाईन तांडा, खैरगाव तांडा, बुरुकुलवाडी, बोरगडी तांडा, कोठा तांडा यांसह अनेक वाडी–तांड्यांना प्रत्यक्ष भेटी देत कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

या दौऱ्यात प्रत्येक वाडी–तांड्यातील नायक कारभारी, डाय सानो, हसाबी, नसावी यांच्याशी थेट संवाद साधत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर होणाऱ्या भव्य ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे, असा संदेश त्यांनी दिला.

या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून शीख धर्म आणि बंजारा–लबाना समाजातील ‘गुरुभाऊ’ नातेसंबंधांचा इतिहास, मुघल व इंग्रजकालीन संघर्ष, त्याग आणि योगदानावर प्रथमच सविस्तर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बंजारा–लबाना समाजाच्या गौरवशाली इतिहासाला नवी ओळख मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नांदेड येथे होणाऱ्या या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून, समाजातील कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. या पार्श्वभूमीवर, समस्त बंजारा समाजासाठी हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आशिष सकवान यांनी केले.

या जनजागृती दौऱ्यात मोतीराम कारभारी, शंकर नाईक, लक्ष्मण जाधव, शामराव राठोड, शुभम जाधव, नितीन राठोड, लवसिंग राठोड, राजू राठोड, आदित्य राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.

वाडी–तांड्यापर्यंत पोहोचलेला हा हिंद दी चादरचा संदेश केवळ निमंत्रणापुरता मर्यादित न राहता, समाजाच्या अस्मितेचा आणि इतिहासाच्या गौरवाचा आवाज ठरत असल्याचे चित्र हिमायतनगर तालुक्यात दिसून येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button