Saturday, June 27

Tag: reaches villages and hamlets

Hind di chadar : हिंद दी चादरचा संदेश वाडी–तांड्यापर्यंत; आशिष सकवान यांचा तालुकाभर जनजागृती दौरा

Hind di chadar : हिंद दी चादरचा संदेश वाडी–तांड्यापर्यंत; आशिष सकवान यांचा तालुकाभर जनजागृती दौरा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) ‘हिंद दी चादर’ – धर्म, त्याग आणि बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील वाडी–तांड्यांवर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक तथा बंजारा समाजाचे समाजभूषण आशिष सकवान यांनी तालुक्यातील लाईन तांडा, खैरगाव तांडा, बुरुकुलवाडी, बोरगडी तांडा, कोठा तांडा यांसह अनेक वाडी–तांड्यांना प्रत्यक्ष भेटी देत कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. या दौऱ्यात प्रत्येक वाडी–तांड्यातील नायक कारभारी, डाय सानो, हसाबी, नसावी यांच्याशी थेट संवाद साधत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर होणाऱ्या भव्य ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा ऐतिहासिक क्...
error: Content is protected !!