उस्माननगर| समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील प्रगतिशील प्राचार्य गोविंद बोदेमवाड (Principal Govind Bodemwad) यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात साजरा झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी हे होते तर.प्रमुख पाहुणे म्हणून कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर , माधव पावडे , तुकाराम वारकड गुरूजी , आनंदराव शिंदे , काजी सेट , दाऊद शेख , संस्थेचे सचिव बां.दे.कुलकर्णी , शाळेचे मुख्याध्यापक गणेश सोनवणे , सत्कार मुर्ती बोदेमवाड परिवार उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरूवात झाली. संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत समारंभ करण्यात आले.त्यानंतर समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंद बोदेमवाड यांचा सहपत्नी,आई वडील यांचा यथोचित सत्कार करून संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह व आहेर भेट देऊन निरोप देण्यात आला.

यावेळी प्रा .कटकमवार, सुरेश मामा बास्टे , शिवाजी बोदेमवाड , तुकाराम वारकड गुरूजी , श्यामसुंदर जहागीरदार गुरूजी, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त प्राचार्य गोविंद बोदेमवाड सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्यात आपला जीवनपट सांगताणा डोळ्यात अश्रू आले. व शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागते म्हणून शाळेसाठी एक लाख रुपये जाहीर केले. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले मनोगतात आपली राजकीय सुरूवात उस्माननगर येथून झाल्याचे सांगितले. याबरोबरच मार्मिक शब्दांत राजकीय भाषाण केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद वारकड यांनी केले तर प्रास्ताविक प्रतिक देशमुख यांनी केले यावेळी परिसरातील मित्र परिवार, सगे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
