नांदेड| नांदेड महानगर पालिकेतील जलतरणीकेच्या प्रशिक्षक आणि जीव रक्षक यांचे कार्य महत्त्वपूर्णच नव्हे तर अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (Mla. Balaji Kalyankar) यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, मुंबई यांच्या वतीने 21 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 रोजी आयोजित मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेतील विजेत्या जलपटूंच्या आणि प्रशिक्षकाच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भास्कर अत्रे, गोविंद मुंडकर, बापू किनगावकर, मुगाची काकडे, शेखर भावसार यांची उपस्थिती होती.

कल्याणकर पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगर विकास मंत्रालय आहे. या विभागाची सर्व कामे करण्याच्या अनुषंगाने माझे प्राधान्यक्रम असणार आहे. याचबरोबर महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध सोयी सुविधा पाहत असतानाच प्रशिक्षक आणि जीव रक्षकाच्या विविध बाबी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचा माझा मानस आहे. ते पुढे असेही म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण असे यश मिळवले त्यांचे मी मनातून कौतुक करतोय. याचबरोबर अशी नवीन पिढी सातत्याने घडत राहावी यासाठी चांगले प्रशिक्षक आणि जीव रक्षकाच्या सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

या कामी जिथे निकडता असेल तिथे मी स्वतः पुढाकार घेऊन प्रशिक्षक आणि जीव रक्षकाचे तसेच जलतरण विद्यार्थी (Succssful Swimmers) विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मुंडकर, बिलोलीकर, यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरावासह महानगरपालिकेतील विविध बाबीचे विश्लेषण केले. गोदावरी जलतरण संघटना यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील प्रमाणित असलेले नांदेडचे प्रशिक्षक संघर्ष सोनकांबळे आणि मयूर केंद्रे यांचा आमदार कल्याणकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

तसेच10 कि मी अंतर पूर्ण करणारे खेळाडू राजेंद्र ताटे, गंगाधर पवार 5 कि.मी. अंतर पूर्ण करणारे ईशान चालीकवार,आदित्य नरवाडे, 3 कि.मी. अंतर पूर्ण करणारे खेळाडू अभिनव गायकवाड, आरीख अश्रण शेख, श्रीया सोनटक्के, ओमकार पोलकेवार, वेदांत क्षीरसागर, जयप्रकाश क्षीरसागर, शेख फिरोज, मुकेश बुकारी, बालाजी पवार, गंगाधर सूर्यवंशी, गंगाधर पवार, राजेंद्र ताटे, रामेश्वर जाधव, 2 कि. मी. अंतर पूर्ण करणारे खेळाडू भास्कर आत्रे, प्रकाश बोकारे, विरभद्र इडगे, रुद्र गंदेवार, सनिधी अकोले, आरोही मोगले, संकेत तोटावार, शेख झोहा, 1 कि. मी अंतर पूर्ण करणारे खेळाडू श्रीशा देशमुख, श्लोक सोनटक्के, मनन सावरगावे, प्रियांशु रब्बेवार, मुकेश कबनूरे, अश्रण अश्रफील शेख, मल्हार कदम. यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू किनगावकर यांनी केले,सूत्रसंचालन आनंद देशमुख आणि नरवाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनिल विंगेवार, नवनाथ सावरगावे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक जलतरणपटू आणि जलतरणप्रेमी उपस्थित होते.
