Adititai Tatkare : माता भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणाची क्रांती : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – ना. अदितीताई तटकरे – NNL

हदगाव/हिमायतनगर| मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही अत्यल्प अर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी स्वातंत्र्याची नवी क्रांती ठरणारी आहे. माझं स्वतःचं बँकेत खाते आहे. आणी त्या खात्यात माझे स्वतःचे पैसे आहेत ही भावना महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने नेणारी आहे.व स्वताचा आत्मविश्वास वाढवणारी ही योजना आहे. असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदितीताई वरदा सुनील तटकरे यांनी केले.

हदगाव येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हदगावचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील कदम, व तसेच हिमायतनगर तालुक्याचे अध्यक्ष अभिषेक लूटे यांच्या प्रयत्नातून दि. ८ गुरुवारी महिला मेळावा मा. ना. कु. अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ना. तटकरे बोलत होत्या.

पुढे बोलतांना मंत्री तटकरे म्हणाल्या की, रक्षा बंधनापुर्वी म्हणजेच १६ व १७ ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. राज्यभरातून १ कोटी ४० लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ कोटी २५ लाख अर्ज पात्र ठरले आहेत. आता अर्थिक सक्षमीकरणाच्या शासनाच्या या प्रयत्नाला राज्यातून महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री ना. कु. अदितीताई वरदा सुनिल तटकरे यांनी सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुरेश दादा चव्हाण, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत सुगावे पाटील, जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वांबर पवार, जिवन पाटील घोगरे, दिलीपराव धर्माधिकारी,फिरोज पटेल,  अतुल हिंगमिरे,पुजाताई व्यवहारे, सुनंदाताई जोगदंड, ज्योतीताई सोनटक्के, सुरेखा पाटील, विधान सभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव, शहराध्यक्ष खाजाभाई, कन्हैया कदम आदींसह राष्ट्र वादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिलां, भगिनींची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button