नवीन नांदेड| वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगराचा वतीने परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची विटंबना झालेल्या निषेधार्थ 12 डिसेबंर रोजी माता रमाई आंबेडकर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने माता रमाई आंबेडकर चौक येथे निदर्शने करण्यात आले. यावेळी वचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे,नांदेड दक्षिण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हाकार्याध्यक्ष सुदर्शन कांचनगिरे, अमृत नरंगलकर, डुमणे,यांच्या सह पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कायदा व सुव्यवस्था अबांधित रहावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरूव यांनी सिडको परिसरातील माता रमाई चौक येथे भेट देऊन पोलिस बंदोबस्त आढावा घेतला.