नवीन नांदेड l वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्रामविकास महसूल अधिकारी म्हणून अंजुषा जाधव यांनी पदभार घेतला असुन कार्यालयीन सहाय्यक यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाघाळा तलाठी कार्यालय येथील कार्यरत तलाठी चंद्रकांत कंगळे यांच्यी मंडळ अधिकारी म्हणून किनवट पदोन्नती वर बदली झाल्यामुळे नांदेड तहसील कार्यालय येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अंजुषा जाधव यांच्यी वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्राम महसूल अधिकारी पदावर नियुक्ती झाली असून 10 डिसेबंर रोजी त्यांनी कार्यालय येथे पदभार घेतला आहे. कार्यालयीन सहाय्यक व्यंकट इंगळे, जाधव यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.