Wednesday, May 13

Marathwada ; मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदानासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न

नांदेड l सर्वांनाच जुनी पेन्शन लागू करावी व राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान द्यावे, राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण व यथानियम वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर वतीने धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

या आंदोलना मागच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे 1) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु नंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी.

2) राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार 100% अनुदान देण्यात यावी.

4) राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यथानियम वेतन व सेवासंरक्षणाचे सेवानियम लागू करण्यात यावेत.
5) राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 10,20,30 अशा तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.

5) 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश रद्द करावी. यासह इतर 23 मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे.

याप्रसंगी मराठवाडा  शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सहसचिव सो रेखा सोळुंके, जिल्हाध्यक्ष व्ही आर चिलवरवार,आनंद मोरे, विजयालक्ष्मी स्वामी, आर पी वाघमारे, जयवंत शिंदे, मोहन पिनाटे, अब्दुल हसीब, राम यडते, बाबाराव घाटे, दत्ता कोम्पलवार, डी एम पाटील, आतनुरकर सर, आनंद सुरसे, विनोद भुताळे, मुख्याध्यापक संघटनेचे गजभारे सर, शिक्षकेतर संघटनेचे पी आय पेंडकर, उत्तम लाटकर, इसादकर, नाझिया कौसर, सुलताना मॅडम, मधुकर वानखेडे, सुरेश ईदलवार, अतनूरकर सर पुरणे सर, अनिल सुगावकर, गजानन घोरबांड, डी.जी धनगरे, एम जी तेलंग, यांच्यासह शिक्षक भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!