Marathwada ; मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदानासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न
नांदेड l सर्वांनाच जुनी पेन्शन लागू करावी व राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान द्यावे, राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण व यथानियम वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर वतीने धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
या आंदोलना मागच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे 1) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु नंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी.
2) राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अन...
