हदगांव| हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये वकील करणारे ॲड. दिगंबर सूर्यवंशी-देशमुख (Advt. Digambar Suryavanshi – Deshmukh) यांची भारत सरकारच्या विधी व न्याय विभागामार्फत नुकतीच नोटरी पदी निवड झाली आहे. विधी व न्याय विभागाकडून त्यांना ईमेलद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

वकिली व्यवसायात कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ॲड. दिगंबर सूर्यवंशी यांनी प्रामाणिकपणे गरजवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून हदगाव व नांदेड न्यायालयात यशस्वीपणे काम करून नावलौकिक मिळवला आहे. आता त्यांना नोटरीच्या माध्यमातून गरजवंतांची अधिक सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

त्यांच्या निवडीमुळे हदगाव न्यायालयातील न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हबीब मदनी तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पंडितराव देशमुख, ॲड. उत्तमराव टिकोरे, ॲड. शिवकिरण भारती, ॲड. दीपक पवार, ॲड. राजकुमार देशमुख, ॲड. नागोराव वाकोडे, ॲड. गंगाधर पंडित, ॲड. संतोष टिकोरे, ॲड. रामदास डावरे, ॲड. मधुकर गोरे, ॲड. सचिन पांडे, ॲड. विजय माने, ॲड. बाळासाहेब दुगाळे, ॲड. संदीप तावडे, ॲड. नवनाथ पाटील, ॲड. साईनाथ पाटील, ॲड. दिगंबर कदम, ॲड. सावतकर यांसह सर्व कर्मचारी व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
