हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्याच अवैध रेतीच उपसा आणि चोरटी वाहतूक प्रचंड प्रमाणांत सर्रास सुरू आहे. तहसील स्तरावरील पथकांकडून या विरोधात मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या केवळ 13 कारवाया करण्यात आल्या. 10 वाळूच्या व 3 मुरुम अश्या 13 दंडामक कारवाई करण्यात आलेली असून, या चालू आर्थिक वर्षात असल्याची माहीती मिळाली. त्यातील किती प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली या याबाबत स्पष्ट माहिती देण्यात येत नाही. आकडेवारीचे अवलोकन केले असता मुळात हदगांव तालुक्यात रेती तस्करीचा सुरू असलेला गोरखधंदा पाहता महसूल प्रशासनाची कारवाई (Hadgaon taluka revenue administration) केवळ टार्गेटपुरतीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून हदगाव तहसिल विभागाच्यगौनखनिज चालू अर्थिक वर्षात वसुलीचे कितीचे टार्गेट देण्यात आले आहे. स्थानिय प्रशासन द्वारे सांगण्यात आले नसले तरी, तालुक्यांत जवळपास 15 च्या वर रेती घाट आहे. तर २० पेक्षाही कमी कारवाया झालेल्या असल्याने प्रशासना बाबत संशयाला वाव मिळत असून, गौण खनिज विभागही संशयाच्या भोवऱ्यात सापडत दिसत आहे. नव्या आर्थिक वर्षात कितीच वसुलीचे उद्दिष्ट आहे या बाबत माहीती देण्यात येत नाही तहसिल कार्यालयच महसुल विभागाची कार्यशैली मात्र ‘ संशयाच्या भोव-यात वावरल्या सारखे दिसत आहे.

हदगाव तालुक्यात शासनाच्या विविध योजना द्वारे विकास कामे जोमात सुरू आहेत. बहुसंख्य कंत्राट लोकप्रतिनिधीच्या जवळच्याच असल्याने व दूसऱ्या च्या नावे कंत्राटे घेण्यात येतात ते…… रॉयल्टी किती भरतात याबाबत कोडेच असून, ह्या विभागाला दिलेल्या गौण खनिज वसुली उद्दिष्टामध्ये रॉयल्टी रकमेचा ही मोठा वाटा असतो. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम, पाटबंधारे, जलसंधारण, नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आदी विभागां- मार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकास कामाची रायलटी कश्या प्रकारे त्याच्या कडून घेण्यात येते. या बाबत वारंवार विचारणा केल्यावर ही स्थानिय गौणखनिज विभागा कडून माहीती देण्यात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

तालुक्यात अवैध उत्खननही जोरात सुरु आहे. मुरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होते आहे. काही ठिकाणी तर विना क्रमांक असलेल्या टिपर, हायवा, ट्रकटर द्वारे गौण खनिजचे उत्खनन होत असून, विना परवाना त्याची वाहतूक केले जाते. हा सर्व गैरप्रकार नियमित कसे काय करण्यात येत असावे..? असा प्रश्न सर्वसामान्य पर्यावरणप्रेमी नागरिकांना पडलेला आहे. यात शासनाचा महसूल बुडतो दुसरीकडे पर्यावरणाची प्रचंड प्रमाणांत हानी होत आहे. मात्र तहसिल कार्यालयच्या गौण खनिज विभागाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहेत. याबाबत हदगाव तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी यांचेशी अनेक वेळा संपर्क साधण्याच प्रयत्न केल असता ते बीझी असल्याचे सागण्यात आले.
