Ajitdada pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामूळे अभ्यासू व दुरदृष्टीचे नेतृत्व हरपले- डॉ.सुनील कदम

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामूळे अभ्यासू व दूरदृष्टीचे नेतृत्व हरपल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या डाॅक्टरलाईन येथिल पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात आज आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना साश्रूनयनांनी अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

यावेळी पूढे बोलतांना डॉ.सुनील कदम म्हणाले की, शिव-फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवांच्या पुरोगामी विचारांचा वारसा रुजवितांनाच माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांचा समर्थपणे राजकीय वारसा चालवून सर्वच समाजघटकांना न्याय देत अजितदादांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.कुशल प्रशासक, रोखठोक बाणा व कर्तव्यात कठोर असलेले दादा जनसेवेत सदैव कर्तव्यतत्पर लोकनेतृत्व होते.या राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असून असा नेता पून्हा होणे नाही.

यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर,पक्षाच्या शिख सेलचे प्रदेशाध्यक्ष जर्नेलसिंघ गाडीवाले, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.मुजाहिदखान,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, लक्ष्मण भवरे,युवकचे शहर जिल्हाध्यक्ष स.मनबीरसिंघ ग्रंथी,विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन, शफी उर रहेमान,युनूसखान, दिगांबर पोकळे,नाना पोहरे, पाशाखान तांबोळी,अमित कांबळे, तरविंदसिंघ बडगुजरा, प्रेमजितसिंघ कोल्हापूरे, अँड.प्रकाश घोगरे, शेख रसुल, हंसराजसिंघ पटवारी, मो.अरसलान,रोहित पवार, जसबिरसिंघ लखवाले, बक्शीसिंघ पुजारी, अँड.अमोल प्रकाश मुराळकर,नंदकिशोर परदेशी,बालाजीसिंह ठाकूर आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button