नांदेड| जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक (सन २०२५-२०३०) शनिवार दिनांक २१ जून रोजी निवडणूक प्रक्रिया एकूण ६ बूथ वर घेण्यात आली. यामध्ये सहकारी पतसंस्थेच्या एकूण ७१३ सभासद मतदारांपैकी पैकी ६९१ (९६.९१%) इतक्या प्रचंड संख्येने मतदानाचा हक्क बजावला.


22 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून *महारुद्र पॅनलला ९* जागा मिळून बहुमत मिळाले तर सत्ताधारी *मित्र मंडळ पॅनलला ६* मिळून पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत यावेळी सभासदांनी निर्णायक मतदान करून सहकारी पतसंस्थेत परिवर्तन घडून आणले. निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची सभासद संख्या जास्त असल्यामुळे डीएनइ 136, ग्रामसेवक संघ व तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना मिळून समन्वय सभा पार पडली होती.

सदर बैठकीत ५ जागा ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास देणेबाबत ठरले होते. त्यामध्ये डीएनइ 136 -२, संघ १ तर तांत्रिक संघटनेला १ जागा देणे बाबत सत्ताधारी मित्र मंडळ पॅनलने ठरविले होते. परंतु ऐनवेळी शब्द फिरून डीएनइ १३६ ने सर्व ४ जागा लढवल्या तर संघाला व तांत्रिकला एकही जागा दिली नाही. यावेळी तांत्रिक संघटनेची सभासद संख्या कमी असल्याचा समज करुन तांत्रिक संघटणेला जागा न देणे बाबत मित्र मंडळ पॅनलने भूमिका जाहीर केली.

तांत्रिक संघटनेला पॅनल मध्ये जागा न दिल्याने नांदेड येथील संघटनेच्या नेतृत्वाने राज्याध्यक्ष नितीन धामणे राज्यसचिव हरिश्चंद्र काळे यांच्याशी संपर्क केला. राज्य नेतृत्वाने निर्णय भूमिका घेऊन महारुद्र पॅनलला बिनशर्त पाठिंबा देण्याची सूचना केली होती.

राज्यकार्याध्यक्ष मधुकर मुंगल, जिल्हाध्यक्ष गुलाब वडजे ,जिल्हा सचिव संजय देशमुख, कार्याध्यक्ष संदीप कच्छवे, बालाजी पंतोजी,समन्वयक अरुण चौधरी, अनुप श्रीवास्तव, प्रभाकर सोगे,मोहन राहुलवाड, माधव ढगे,बालाजी कनोजवार, शेख एजाज, नारायण काळे,शोभा पारसेवार प्रशांत कोकाटे, भास्कर कापसे,जगन्नाथ लाकडे, संतोष सितावार,विशाल वडजे,चिकलपल्ले, मोहन अडकिने यांचेसह इतर सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी बैठक घेऊन महारुद्र पॅनलला बिनशर्त जाहीर पाठिंबा व्यक्त करून संपूर्ण निवडणूक प्रचार काळात निवडणूक यंत्रणा हातात घेऊन रात्रंदिवस शिलाई मशीन या चिन्हाचा प्रचार केला.
पतसंस्थेत सध्या सुरू असलेले आर्थिक गैरव्यवहार, अपारदर्शक कारभार, बोगस विमा हप्ते कपात, जादा व्याजदराने सभासदांना होणारा कर्जपुरवठा सत्ताधाऱ्यांची मनमानी, आर्थिक गैरव्यवहार, इ. प्रचारातले ठळक मुद्दे सभासदांसमोर मांडण्यात आले. तसेच तांत्रिक संघटनेने संवर्ग हितासाठी केलेले राज्यस्तरीय कामकाज यावरही प्रचारात भर देण्यात आलेला होता. यावेळी तांत्रिक संघटनेणे घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेमध्ये परिवर्तन होऊन *तांत्रिक ग्रा.पं.अ. संघटना किंगमेकर* झाली आहे.
तांत्रिक संघटनेच्या सभासदांनी राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून महारुद्र पॅनलला दिलेला निर्णय व एक गठ्ठा मतदान केल्यामुळे महारुद्र पॅनलचा विजय सुकर झाला व बहुमत मिळाले आहे. या निकालामुळे नांदेड जिल्ह्यात तांत्रिक ग्रा.पं.अ. संघटनेची पाळेमुळे अधिक खोलवर रुजलेली असून संवर्ग हितासाठी संघटना बळकट होण्यास मदत होईल अशी भावना राज्याध्यक्ष नितीन धामणे व राज्य सचिव हरिश्चंद्र काळे, महेंद्र निकम, स्नेहल नरळे, नारायण पवार, यांनी व्यक्त करून यावेळी बोलताना त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.