Ajitdada pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामूळे अभ्यासू व दुरदृष्टीचे नेतृत्व हरपले- डॉ.सुनील कदम
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामूळे अभ्यासू व दूरदृष्टीचे नेतृत्व हरपल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या डाॅक्टरलाईन येथिल पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात आज आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना साश्रूनयनांनी अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
यावेळी पूढे बोलतांना डॉ.सुनील कदम म्हणाले की, शिव-फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवांच्या पुरोगामी विचारांचा वारसा रुज...
