नांदेड| दिनांक १४.१२.२०२४ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, नांदेड मुख्य प्रशासकीय इमारत येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीकरीता मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता कराविषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याकरीता सुचित केले व मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालती करीता मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती. सुरेखा एस. कोसमकर, मनपा आयुक्त मा. श्री डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. सचिव विधी सेवा प्राधीकरण श्रीमती. दलजीत कौर मनीपालसिंघ जज, मा. न्यायाधिश श्रीमती. के.पी. जैन (देसरडा) (पॅनल प्रमुख), अॅड. नसरीन ए. करीम खान, मा. अति. आयुक्त श्री गिरीष कदम, उपआयुक्त (कर) श्री अजीतपालसिंघ संधु, श्रीमती मनिषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त (कर), सिस्टीम मॅनेजर श्री सदाशिव पतंगे मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी श्री मिर्झा फरहतुल्लाह बेग, श्री रमेश चवरे, श्री रावण सोनसळे, श्री गौतम कवडे, श्रीमती. निलावती डावरे, श्री. राजेश जाधव न्यायालयीन कर्मचारी श्री एस.व्ही. शेटकार, श्री. एम. बी. भोसीकर, श्री. आर.आर. जुलुरी सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस जे मनपा मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस वाटप करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीसीचे वाटप करण्यात आले.
आज दिनांक १४.१२.२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. पासुन लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना मनपा आयुक्त मा. श्री. डॉ. महेशकुमार डोईफोडे मा. न्यायाधिश श्रीमती. के.पी. जैन (देसरडा) (पॅनल प्रमुख) यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ता धारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये ३१०० मालमत्ता धारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८०% सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण रु. ५,७२, ३६,८६२/-(रुपये पाच कोटी बहात्तर लक्ष छत्तीस हजार आठशे बासष्ठ फक्त एवढा मालमत्ता कराचा भरणा केला.
शास्ती माफी योजनेस नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता थकबाकीवरील शास्ती माफी मध्ये ८० टक्के सुट योजनेस दिनांक २० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून ही अंतिम मुदतवाढ असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी लाभ घेण्याचे तसेच ज्या मालमत्ता धारकांनी मनपा मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या कार्यवाही टाळाव्यात असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले