Enthusiastic response of citizens to Lok Adalat : लोक अदालतीस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, शास्ती माफी योजनेस २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL
नांदेड| दिनांक १४.१२.२०२४ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, नांदेड मुख्य प्रशासकीय इमारत येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीकरीता मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता कराविषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याकरीता सुचित केले व मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालती करीता मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती. सुरेखा एस. कोसमकर, मनपा आयुक्त मा. श्री डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. सचिव विधी सेवा प्राधीकरण श्रीमती. दलजीत कौर मनीपालसिंघ जज, मा. न्यायाधिश श्रीमती. के.पी. जैन (देसरडा) (पॅनल प्रमुख), अॅड. नसरीन ए. करीम खान, मा. अति. आयुक्त श्री गिरीष कदम, उपआयुक्त (कर) श्री अजीतपालसिंघ संधु, श्रीमती मनिषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त (कर), सिस्टीम मॅनेजर श्री सदाशिव पतंगे मनपाच्या सहा ...
