Tow youth dead : नांदेडमधील दोन तरूणाचा किवळा येथील खदानित बुडून मृत्यु

उस्माननगर, माणिक भिसे|  लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलावाजवळील खदानीतील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. दोघेही खदानीशेजारी रील्स बनवत असल्याचे सांगण्यात आले. दोघांचेही मृतदेह रात्री दहा वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.

शेख बाबर शेख जफर (वय १५, रा. बळीरामपूर, नांदेड), मोहम्मद रेहान मोहम्मद युसूफ (वय १६, रा. देगलूर नाका, नांदेड) अशी मयतांची नावे आहेत. दोघेही गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास साठवण तलावा शेजारील सांडव्या जवळ असलेल्या खदानीजवळ रील्स बनवत होते. यावेळी काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना रील्स बनविताना पाहिले होते. मात्र, दोघेही तोल जाऊन खदानीत पडल्याने घटनास्थळी असलेल्या इतर मुलांनी तेथून पळ काढला.

 

Oplus_16908288

घटनेची माहिती मिळताच इतवाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह तासाभराच्या फरकाने रात्री बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. सोनखेड पोलिसांना या कामी जीवरक्षक दलाची मदत घ्यावी लागली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button