नांदेडराजकीय

Election Inspector ; निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83-किनवट निवडणूक कामाची केली पाहणी – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे l निवडणूक निरीक्षक (सामान्य) शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83- किनवट विधानसभा मतदार संघातील निवडूक विषयक कामकाजाचा आढावा घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्री शैलेंद्र कुमार यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्र. 7499127265हा आहे. Observer code-G-35602 हा आहे. ते ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ते काम पाहत आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 83-किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी नियुक्त केलेल्या सर्व कक्षाचे प्रमुख तथा सर्व नोडल अधिकारी यांची त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात बैठक घेवुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांची सुद्धा आदर्श आचारसंहितेबाबत बैठक घेवुन मार्गदर्शन केले.

IMG 20241105 WA0009 Election Inspector ; निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83-किनवट निवडणूक कामाची केली पाहणी - NNL

सदर बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, किशोर यादव, डॉ.अजय कुरवाडे, नायब तहसिलदार मोहमद रफीक, राजकुमार राठोड, रामेश्वर मुंडे हे उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!