Homeडॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाओ समितीचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन -NNL

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाओ समितीचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन -NNL

नांदेड| शहरातील जुने एसबी एच बँक ते पक्कीचाळ पर्यंत च्या मार्गास तत्कालीन नांदेड नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असे नाव दिले असता दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी त्याच मार्गावरील काही भागास महापालिका प्रशासनाने जुने एसबीएच बँक ते तिरंगा चौक पर्यंतच्या मार्ग ठक्कर यांचे नाव दिले या गैरकर्त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड बचाओ समितीने 2 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 6 डिसेंबर 2022 पर्यंत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेपुढे बेमुदत धरणे आंदोलन केले.

या धरणे आंदोलनाची मनपा प्रशासनाने काही दखल न घेतल्यामुळे समितीच्या वतीने मनपाचे आयुक्त यांना विचारण्यात आले की पकीचाळ या ठिकाणी जे नाम फलक आहे त्या नामपलकाची नोंद आपल्या कोणत्या अभिलेखा मध्ये आहे त्याचे उत्तर देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. तसेच जो प्रस्ताव आहे बेकायदेशीर आहे त्याला कोणीही अनुमोदन दिले नाही आणि अनुमोदन न दिलेल्या प्रस्तावाची त्यांनी तातडीने अंमलबजावणी केली आणि तीही अंमलबजावणी सुट्टीच्या दिवशी करण्यात आलेली आहे. तसेच अंमलबजावणी करताना कोणत्याही वर्तमानपत्रांमधून फारशी प्रसिद्धी करण्यात आली नव्हती.

एका स्थानिक दैनिकात कुठेतरी छोटीशी बातमी देऊन सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याचे समजते. याचे कारण असे की नांदेड शहरांमधील आंबेडकर अनुयांना ही घटना कळू नये हा त्यांचा उद्देश होता. अशा या गैरकर्त्याच्या निषेधार्थ नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले आहे. या आंदोलनामध्ये सर्व आंबेडकरी अनुयांनी सहभागी व्हावे असे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाव समितीचे संयोजक संजय वाघमारे ,संजय टिके, केशव थोरात, प्रकाश रायबोले यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments