नांदेडकरियर

Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड। मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत राहून पुरस्कार सोहळ्यासह विविध उपक्रम राबवणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबई येथील आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव, दादर (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून विविध वर्तमानपत्रात सेवा देत सतरा वर्षांपासून दै. समीक्षा वृत्तपत्र काढून अन्यायाविरुद्ध वाचा फोडत वंचितचा लढा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे कार्य संपादक रुपेश पाडमुख हे सातत्याने करत आहेत. एवढ्यावरच न थांबता वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देणार्‍यांना पुरस्कार देण्यासह शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, पोलीस दलातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सन्मान आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणार्‍यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम सतरा वर्षांपासून राबविण्यात येतो.

वृत्तपत्र क्षेत्रासहीत सामाजिक सेवेची दखल घेऊन मुंबई येथील पत्रकार संघ व सा. भगवे वादळ यांनी आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे. मुंबईचा पुरस्कार पाडमुख यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button