HomeBlogAnita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड - NNL

Anita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड – NNL

नांदेड | अर्धापूर येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयात परिचर या पदावर कार्यरत असलेले बाबुराव तुकाराम राठोड यांची कन्या अनिता बाबुराव राठोड यांची आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाली आहे. मुखेड तालुक्यातील वसंत नगर तांडा या दुर्गम भागात असलेल्या लहान गावात जन्मलेल्या अनिता यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण वसंत नगर येथील शाळेत पूर्ण झाले

अनिता राठोड या शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार आणि मेहनती मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी मधून पूर्ण केल्यानंतर त्या स्पर्धा परिक्षाकडे वळाल्या व त्या ठिकाणी चिकाटीने मेहनत करत पहिल्या प्रयत्नात त्या पूर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुख्य परीक्षेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत त्यांनी यश संपादन केले आणि आयोगा द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली

त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय पती गणेश भारत चव्हाण ,सासरे भारन चव्हाण सासू नंदाबाई चव्हाण यांच्यासह आई-वडील बहिण भाऊ तसेच आपल्या मार्गदर्शकांना दिले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे परिवाराकडून व नातेवाईकांकडून अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments