Tree planted : लोहा पोलीस ठाण्यात १०० हुन अधिक फळवृक्षांची लागवड; पोलीस निरीक्षक आयलाने यांचा पुढाकार

लोहा| पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्या सोबतच पोलीस ठाणे सुशोभीकरण ,स्वच्छ जसे राहील याची दक्षता घेत असतात.असे अधिकारी मोजकेच असतात.लोहयाचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी निवास स्थानाचा चेहरामोहरा बदला .त्यानंतर ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत १००हुन अधिक फळाची झाडे लावण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी आपापल्या कर्तव्यावर असताना वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.स्वछता तसेच गार्डन तयार करतात तर काही अधिकारी परिसर स्वच्छता करतात. तत्कालीन पोलीस अधिकारी हणमंत परांडे यांनी पोलीस ठाणे जुन्या जागेतून जुन्या तहसील कार्यालयात आणले.आजच तेथेच ठाणे आहे डीएसबीचे जमादार सदाशिव जामकर त्यावेळी ही होते . त्यानंतर गोवर्धन कोळेकर यांनी कुंड्यात वेगवेगळे झाडे लावून पोलीस ठाणे आकर्षक केले होते. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री चाटे यांनी गार्डन तयार केले होते.

पोलीस निरीक्षक नागनाथ आईलाने यांनी ठाण्याचा परिसर आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीने स्वच्छ केला आहे तसेच विद्युत दिवे लावले आहेत .पोलीस निरीक्षक याच्या निवासस्थानाचा श्री आयलाने यांनी चेहरा मोहरा बदलला आहे. विविध भाजी पाला तसेच झाडे लावली आहेत. कोणत्याही खताचा व फवारणीचा उपयोग केला जात नाही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो.

पोलीस ठाण्याच्या मागील भागात झाडेझुडपे वाढली होती. मियावाकी लावण्यात आली होती. पण चार वर्षे झाली ती सगळी झाडे वाळून गेली त्या भागाची हवालदार जामकर व होमगार्ड तसेच पोलीस कर्मचारी याच्या मदतीने साफसफाई करून घेतली त्या भागात रेखीव पद्धतीने 100 झाडे लावलेली आहेत.

ती सर्व फळांची असून आंबा, जांब ,सिताफळ, आवळा जांभूळ चिंच , साग अशी विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जे काम करायला पाहिजे पण हा विभाग झोपी गेला आहे. पोलीस प्रशासन कर्तव्यासोबतच अधिकाधिक समाजोपयोगी कार्य करत आहेत. पोलिसिंग आता लोकांच्या सेवेत सदैव असते .पोलीस निरीक्षक आयलाने याच्या पुढाकराने लोहा पोलीस ठाणे आता हिरवेगर्द होणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button