श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| साडे तीन शक्ति पीठा पैकी एक मुळ शक्ती पिठ असलेल्या आई रेणुका मातेच्या नवरात्र महोत्सवास दि.३ ऑक्टोबर रोजी पासुन सुरूवात होणार असल्याने रेणुका मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांच्या वाहणाची रिघ लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन तत्परता दाखविते परंतु गडावर येणाऱ्या भाविकांचा सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून येत्या नवरात्र महोत्सवा पुर्वी मालवाडा घाटातील अर्धवट अवस्थेत असलेला रस्ता व धनोडा येथिल पैनगंगा नदी पुलास स्वरक्षण कठडे बसवा. अन्यथा परीणाम भोगावे लागेल असा इशारा (उबाठा) शिवसेनेचे ज्योतीबा खराटे यांनी दिला आहे.


गडावरील महोत्सवा पैकी एक प्रमुख नवरात्र महोत्सव आहे, त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातील भाविक देखील लाखोंच्या संख्येने वर्दळ होणार असल्याने त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप व्हावा म्हणून वळणावर असलेल्या मालवाडा घाटातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत रखडले असुन रस्त्याच्या खालील भाग पावसाच्या पाण्यामुळे कोरल्या गेल्याने हा रस्ता रहदारीमुळे कधि खचुन अपघात होईल याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन व शासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता मलावाडा घाटातील तांत्रिक अडचणी दुर करावी.

सदरील रस्ता तातडीने नवरात्र महोत्सवापुर्वी दुरूस्त करावा. त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्याला जोडणार्या धनोडा येथिल पैनगंगा नदी पात्रावरी अरूंद असलेल्या पुलाचे स्वरक्षंण कठडे तुटल्याने रात्री बे रात्री येणाऱ्या भाविकांच्या वाहणास धोका होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याने मालवाडा घाट व पुलाचे कठडे नवरात्र महोत्सवा पुर्वी बसविण्यात यावे, अशी मागणी किनवट- माहुर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे यांनी केली.
