नांदेडक्राईम

SP. Shrikrushna kokate । नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड। शिवाजीनगर हद्दीत दोन दुचाकीचा धक्का एकमेकांना लागल्याने दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आवाहन करण्यात आले की, कोणीही अफवांवर व खात्री न झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल व शांतता भंग होईल असे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित करू नये. कोणी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 19.07.2024 रोजी पो. स्टे. शिवाजीनगर हद्दीत दोन दुचाकीचा धक्का एकमेकांना लागल्याने दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच सदर प्रकरणी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचुन सदर दोन्ही गटातील इसमांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

तरी सदर प्रकरणात आवाहन करण्यात येते की, कोणीही अफवांवर व खात्री न झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल व शांतता भंग होईल असे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित (Viral/Forward) करू नये. आक्षेपार्ह पोस्ट करू नये, सोशल मीडियावर सायबर पोलीसांची करडी नजर आहे. कायद्याचे उल्लंघन होईल असे कृत्य कारवाईस पात्र राहील. अश्या सूचना श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्रसार माध्यमातुन दिल्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!