हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये आज दिनांक 03 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांनी प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.वसंत कदम यांनी त्यांच्या जीवना चरित्रावरती प्रकाश टाकला.


नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीरांनी हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन निजामाच्या अत्याचारी, हुकूमशाही राजवटीच्या विरोधात रणशिंग फुंकले ,अशा या निजामी राजवटीच्या विरोधात लढताना कित्येकांना कारावास भोगावा लागला. काहीना भूमिगत राहून लढा द्यावा लागला तर अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. याच हुतात्म्यापैकी गाव तालुक्यातील वायपना या गावचे शूरवीर धाडसी स्वातंत्र्यसेनानी, हुतात्मा जयवंतराव विक्रमसिंह पाटील होत. ते मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन इतिहासात अमर झाले. हादगाव तालुक्यातील वायपणा हे गाव हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात आजरामर झाले.

हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या बलिदानाने अनेक तरुणांना, स्वातंत्र्यविरांना प्रेरणा मिळाली. हुतात्मा जयवंतराव पाटील यांचा लढा स्वातंत्र्याच्या इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्यांचे बलिदान म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ऐतिहासिक घटना मानली जाते. जयवंतराव पाटील यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. जयंतराव पाटील हे असे एक महान क्रांतिकारक होते .

की साक्षात मृत्यू समोर असताना कशाची तमा न बाळगता शस्त्रुवर तुटून पडले, त्यांच्या नसानसात स्वातंत्र्याचे रक्त सळसळत होते. हुतात्मा जयवंतराव पाटील आयुष्यभर स्वाभिमानाने जगले आणि दुसऱ्याला देखील स्वाभिमानाने जगायला शिकवले, अशा थोर स्वातंत्र्यवीरांनी मात्रभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. इस्लापूर पोलीस ठाण्याच्या मोहिमेत ३० जून 1948 रोजी आपल्या वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी हौतात्मे पत्करले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्मा जयवंतराव विक्रमसिंग पाटील वायपनेकर यांचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही.

त्यांनी मातृभूमीसाठी केलेले समर्पण, त्याग, निस्वार्थ भावनेने केलेली समाजाची सेवा पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहील. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि शक्ती देत राहील. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचा जयजयकार होत राहील. हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी कार्यकर्तृत्व प्रतीकात्मक पुतळ्यास प्रणाम करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.