Birth Anniversary : हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती साजरी… जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले….
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये आज दिनांक 03 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांनी प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.वसंत कदम यांनी त्यांच्या जीवना चरित्रावरती प्रकाश टाकला.
नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीरांनी हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन निजामाच्या अत्याचारी, हुकूमशाही राजवटीच्या विरोधात रणशिंग फुंकले ,अशा या निजामी राजवटीच्या विरोधात लढताना कित्येकांना कारावास भोगावा लागला. काहीना भूमिगत राहून लढा द्यावा लागला तर अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. याच हुतात्म्यापैकी गाव तालुक्यातील वायपना या गावचे शूरवीर धाडसी स्वातंत्र्यसेनानी, हुतात्मा जयवंतराव विक्रमसिंह पाटील होत. ते मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन इतिहासात अमर झाले. हादगा...
