Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या सरसम बु. ते करंजी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुलाच्या सुरक्षा भिंतीच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत जखमी झालेला युवक बुधवारी आढळून आला होता. त्या जखमीं युवकावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी नांदेडला रेफर करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना युवकाची प्राणज्योत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मालवली. अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष असे मयत युवकाचे नावं आहे. युवकांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळीच हिमायतनगर पोलीस ठाणे गाठून, युवकाला जीवानिशी मारणाऱ्यांचा शोध लावून न्याय देण्याच्या मागणी केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते भोकर...
खरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी -NNL

खरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी -NNL

नांदेड
नांदेड/मुंबई, अनिल मादसवार। खरीप हंगाम सन 2023/24 मधिल नुकासनग्रस्त शेतकरी बंधवाना विमा संक्रमित रक्कम तात्काळ देन्यात यावी अशी मागणी आज मंत्रीकृषि मा. ना. श्री धनंजय मुड़े यांची मुंबई येथे भेट घेउन आ. माधवराव पाटिल जवळगावकर यानी निवेदन देऊन केली आहे. मंत्री मोहोदय यांनी दखल घेऊन नांदेड जिल्हाधिकारी याना भ्रमणध्वनीद्वारा संपर्क करुण हा विषय 18 जून रोजी विमा कंपनी सोबत होनार्या बैठकित घेनार असल्याचे सांगुन माहिती पाठवा आश्या सूचना केल्या. उपोषणला बसलेल्या शेतकरी बंधवाना आश्वासन देउन उपोषण सोडवन्यासंबधी विनती करण्यास सांगीतले आहे. यामुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. खरीप हंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा संरक्षित रक्कम न मिळाल्यामुळे मतदार संघातील शेतकरी बांधव उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील असल्याची दखल ...
पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

नांदेड
नांदेड| गुलाबी बोंड अळीने अख्खी कपाशी वाया जाण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळी येणारच नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बोंड अळी पासून संरक्षित असलेल्या व कृषी विभागाने शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी वाणांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतामध्ये बीटी कापसाच्या पूर्ण प्लॉट शेजारी नॉन बीटीची थोड्या प्रमाणात लागवड करण्याची सूचनाही कृषी विभागाने केली आहे .जमिनीत पूर्ण ओलावा आल्याशिवाय पेरणीला हात घालू नये असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नत्र खताचा वापर न करता जमिनीची पत तपासून ( मृदा परिक्षण ) खतांचा वापर करण्याची सूचना केली आहे. कृषी वि...
सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा – NNL

सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी असून बाजारामध्ये मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामात 4 लक्ष 52 हजार हेक्‍टरवर सोयाबीन लागवडीची शक्यता आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या डीएपी खताची मागणी शेतकऱ्यांकडून वाढत आहे. परंतु मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता बाजारामध्ये सध्या नाही. शासन स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे डीएपी खत उपलब्ध नसल्यास शेतकरी बंधूंनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट १४३.५ किलो व युरीया १९ किलो याचा पर्यायी खत म्हणून वापर करावा. यामुळे डीएपी खताप्रमाणे अन्नद्रव्य उपलब्ध होईल व त्यासोबत गंधक 16 किलो उपलब्ध होते. गंधक हे अन्नद्रव्य हे सोयाबीन पिकांसाठी गरजेचे आहे. त...
सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का? सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा – NNL

सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का? सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा – NNL

नांदेड
नांदेड| नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खटल्यांना निकाली काढण्याची एक संधी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन विधी विभागाने केले आहे. तडजोडीची तयारी हवी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या सचिवांकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात या संदर्भातील आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात 29 ते 30 ऑगस्ट या दरम्यान ही विशेष लोक अदालत होत आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आणि ही प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची ज्यांची इच्छा आहे, अशाच प्रकरणाचा या ठिकाणी निपटारा होणार आहे. ...
विद्यार्थ्यांनी किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

विद्यार्थ्यांनी किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार Master of Social Work (MSW), Bachelor of Social Work (BSW) व Bachelor of Computer Application (BCA) प्रथम वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रामध्ये Master of Social Work (MSW), Bachlor of Social Work (BSW) व Bachaller of Computer Application (BCA) या अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्यूत्तर शिक्षण सुरु झाले आहे. किनवट, माहूर परीसरातील विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी नांदेड, संभाजीनगर, पुणे, मुंबई कडे जाण्याची गरज नाही. या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण प्राप्त करण्याची ही उत्तम संधी आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. ...
नांदेडला ‘एज्युकेशन हब’ बनवण्यात श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान -डी.पी.सावंत -NNL

नांदेडला ‘एज्युकेशन हब’ बनवण्यात श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान -डी.पी.सावंत -NNL

नांदेड
नांदेड| ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण करीत 'एज्युकेशन हब' बनवण्यात आपल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी केले आहे. शहरातील बाबानगर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात डी. पी. सावंत बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर,यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कबीर रबडे, प्रा कैलास दाड,मुख्याध्यापिका सौ.एस. आर. कदम,यशवंत महाविद्यालय जिनियस बॅचचे समन्वयक सचिन कदम,पर्यवेक्षक अरुण कल्याणकर ,एस.एन.सूर्यवंशी , सौ व्ही.आर. देशमुख आदींच...
किसान काँग्रेस हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती -NNL

किसान काँग्रेस हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी अंकुश सुभाषराव मोरे यांची नियुक्ती त्यांच्या सामाजिक व काँग्रेस पक्षासाठी करण्यात आलेल्या कामाची दखल घेऊन करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांच्यासो8 किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील चिमेगावकर, नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील पवळे,नांदेड जिल्हा सरचिटणीस, गणेश पाटील ढगे, लक्ष्मन तमलूरे सर,विलास ढगे व इतर काँगेस पधादिकारी उपस्थित होते....
सात दिवस उलटुनही त्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मुत्तदेहाचा तपास लागेना, खूनाचा गुन्हा दाखल -NNL

सात दिवस उलटुनही त्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मुत्तदेहाचा तपास लागेना, खूनाचा गुन्हा दाखल -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली होती , या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. सदरील महीला हि अंदाजे २०ते २५ वर्षाची असल्याचा अंदाजा आहे. ती १२ ते १४ आठवड्याची गरोदर व तिचा गळा चिरून व स्कार्प ने आवळून खून केल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अकस्मात मुत्युची नोद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवाल आल्याने अखेर दि,११ रोजी रात्री सपोनी एस एम परगेवार यांच्या फिर्यादी वरुण माहुर पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम 302, 315, 201 नुसार गुन्हा क्रमांक 65/2024 दखल केला आहे. त्या घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कुष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अध...
अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनासह 1,35,65,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त 12 आरोपी ताब्यात -NNL

अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनासह 1,35,65,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त 12 आरोपी ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अवैध्य रित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनावार कायदेशिर कडक कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 11/06/2024 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील 1) सपोनि / संतोष शेकडे, 2) पोउपनि/मिलींद सोनकांबळे 3) पोउपनि / साईनाथ पुयड यांचेसोबत पोलीस अमंलदार देवुन वेगवेगळी तीन पथके नेमुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहना कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यावरून दिनांक 12/06/2024 रोजी स्थागुशाचे सपोनि / संतोष शेकडे, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, पोउपनि / साईनाथ पुयड यांचे पथकाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, विमानतळ, वजीराबाद हद्दीत पेट्रोलींग दरम्यान मौजे भनगी येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे ...
error: Content is protected !!