Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील ग्रामीण रूग्णालयाशेजारी असलेल्या विजेच्या डीपी जवळ विजेचा शाॅक लागून एका वानराचा मृत्यू झाला असून, महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता ही नाकारता  येणार नाही. हि घटना दि. १२ बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे. हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी उपविभागा अंतर्गत अनेक ठिकाणी डीपी धोकादायक परिस्थितीत अपघाताला आमंत्रण देत आहेत.  अनेक ठिकाणी विजेच्या तारा वाकल्या असून विद्युत प्रवाह असल्याने एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  ग्रामीण रुग्णालयाजवळील उघडी डीपी अपघाताला आमंत्रण देत होती. दरम्यान एक वानर विजेचा प्रवाह लक्षात न आल्याने डीपी जवळ गेले, त्यास विजेचा जबरदस्त शाॅक लागल्याने वानराचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आठवडी बाजार देखील भरत असून, नागरिकांची उपचारासाठी व बाजार करण्यासाठी गर्दी होते आहे...
खा. चव्हाण यांनी मुंबईत घेतली मविआ नेत्यांची भेट.. तरोड्याच्या महेश देशमुख यांना मिळालेले वरिष्ठ काँग्रेस वर्तुळात मानाचे स्थान -NNL

खा. चव्हाण यांनी मुंबईत घेतली मविआ नेत्यांची भेट.. तरोड्याच्या महेश देशमुख यांना मिळालेले वरिष्ठ काँग्रेस वर्तुळात मानाचे स्थान -NNL

नांदेड
नांदेड। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अवघ्या एक महिन्यात भाजपाच्या सक्षम यंत्रणेला धक्का देत जिल्ह्याचे नुतन खा. वसंतराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी पक्ष कार्यालयात भेटी घेतली. खा. चव्हाण यांचे मुंबईत जंगी स्वागत करत अनेकांनी शुभेच्छा वर्षाव केला. लोकसभेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही देशपातळीवरील प्रमुख नेत्यांनी हायटेक सभा नांदेड नायगाव- देगलूर मतदारसंघात घेतल्या मात्र चव्हाणांच्या पाठीशी उभे राहून मतदारांनी कौल देत नांदेडसह मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला एकही जागा मिळू शकली नसल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मविआच्या प्रमुख नेत्यांनी नुतन खा. वसंतराव चव्हाणांचे मुंबईत जोरदार स्वागत केले. दरम्यान काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण...
कालव्याच्या आर्धवट कामामुळे शेतीचे झाले तळे, शेतातील पिकांचे नुकसान, कंत्राटदारची मनमानी -NNL

कालव्याच्या आर्धवट कामामुळे शेतीचे झाले तळे, शेतातील पिकांचे नुकसान, कंत्राटदारची मनमानी -NNL

नांदेड
अर्धापुर/नांदेड। उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्र येणाऱ्या खडकुत खुर्द (ता नांदेड) या शिवारातील ईसापुर कालव्याच्या , लहान, मोठ्या वितरेकेचे काम उन्हाळ्यापासून सुरू आहे. संबंधित कंत्रातदाराने हे काम पूर्ण न करता काही शेतकऱ्यांच्या शेतात आणून कॅनलचं काम थांबविले आहे. त्याचा फटका या शेतकऱ्यांना पडला असून ईसापुर धरणातून येणाऱ्या पाणी उपशातून शेतीत पाणी साचल्यामुळे पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कॅनल दुरुस्ती संदर्भात तातडीची मागणी केली आहे. अर्धापूर तालुक्यात सध्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या छोट्या, मोठ्या वितरेकेचे काम सुरू आहे. खडकुत खुर्द शिवारात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून येणाऱ्या कॅनलचे लहान कालव्यांचे काम परिसरातील सर्वच भागात उन्हाळ्यापासून सुरू आहेत. संबंधित कंत्रातदाराने संबंधित शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता चालढकल...
जिल्हाधिकारी यांचे निर्देश,गाव विस्तारवाढ कामी वझरा शेख फरीद येथील गावखारी अधिग्रहण करणेसाठी माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना पत्र -NNL

जिल्हाधिकारी यांचे निर्देश,गाव विस्तारवाढ कामी वझरा शेख फरीद येथील गावखारी अधिग्रहण करणेसाठी माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना पत्र -NNL

नांदेड
नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली माहूर तालुक्यातील मौजे वझरा (शे. फ.) येथे प्लॉट्स पाडून देण्याची मागणी मागील तीन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. गावखारीची जमीन श्री दत्त शिखर संस्थानाची असल्यामुळे तेथे मागील पन्नास वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. किंबहुना जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक ग्रामस्थ गांव सोडून बाहेरगावी कायमचे गेले आहेत. वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून पेसा क्षेत्रातील ग्राम सभेच्या ठरवास खुप महत्व असते.दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव क्रमांक ३ पारीत करण्यात आला.सन २०२३ मध्ये अर्जदारांनी बेमुदत साखळी उपोषण वझरा येथे सुरु केले होते. तेव्हा किनवट - माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भीमराव रामजी केराम यांनी प्रत्यक्षात उपोषण स्थळी उपस्थित होऊन श्री दत्त शिखर संस्थानच्या विश्वसतांना फोन वरून बोलून घर बांधण्यासाठी जमीन ...
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा -NNL

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, नांदेड तसेच सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला असून सरकारने त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिं 12 जून रोजी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हा नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देऊन करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मागील ८ जून पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आहेत .त्यांच्या या सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी बाबतची दखल शासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे . निवेदनावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड ,मंगेश कदम, तिरुपती पाटील भगनुरे, रामदास कदम, निरंजन कदम, विशाल गायकवाड, शिवा शिंदे, शंकर पानपट्टे, विष्णू पुयड, नागेश कदम व विकास...
हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच पहिल्याच पावसात पडलं पितळ उघडं – NNL

हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच पहिल्याच पावसात पडलं पितळ उघडं – NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, जिकडेतिकडे व मंदिर परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन मछरांच्या उत्पत्ती वाढल्यामुळे नागरिक, भाविक भक्त हैराण झाले आहेत. नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने पावसाळ्या पूर्वी नाल्यांची सफाई केली नसल्याने पाहिल्याचं पावसाने स्वच्छता विभागाचे पितळ उघडं पडलं आहे. यामुळे आता शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कर वासुलीत जसा पुढाकार घेतला जातो तसा जनतेला सुरक्षित आरोग्याची हमी देण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि खोदकाम केलेल्या रस्त्यावर होणारे अपघात टाळावे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकातुन केली जाते आहे. काल झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने शहर परिसरात नाल्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर आले असून, शहरातील बजरंग चौक, सराफ- डॉक्टर लाईन, यासह शहरातील सर्वच वॉर्डातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे दुर...
महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL

महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आदीजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे महामानवासह देशभक्ती, कष्टकरी, निसर्ग, पर्यावरण,  स्त्रीप्रधान, प्रेमकाव्य,  विडंबन गीते, चित्रपट गीते लिहिणारे कवी , संगीतकार वामनदादा कर्डक यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त स्वरांची आंदराजली वाहून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडू भाटशंकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा. डॉ. आनंद भालेराव , वसंत सर्पे, मनोहर साळवे उपस्थित होते. तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे, राहुल तामगाडगे यांच्या हस्ते भ. बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर,वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमापूजनानंतर वंदना घेण्यात आली.उपस्थित विद्यार्थी व रसिकांना संगीत अलंकार, राग रागिणी, सुर, ताल , लय इ. माहिती संचालक सुरेश पाटील, प्रा शिवकुमार कोंडे यांनी दिली. आर्य...
ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत थाटात शुभारंभ – NNL

ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत थाटात शुभारंभ – NNL

नांदेड
नांदेड| येथील फिनान्शियल क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या लक्ष्मीकांत जगलपुरे यांनी नांदेड शहरात दीड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून फिनान्शियल क्षेत्रात आपली सेवा दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत मान्यवरांच्या आणि कुंटुबियांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ केला आहे. सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. या कंपनीच्या मार्फत आम्ही सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरवितो असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच मुंबई करांना सुद्धा फिनान्शियल क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी उद्घाटन प्रसंगी दिली.. आपल्या आजवरच्या व्यावसायिक वाटचालीत आपल्याला आई-वडील, पत्नी सौ. ज्...
मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे NNL

मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला. विविध योजनांचा लाभ देण्यास यापुढेही शासन वचनबद्ध असल्याचे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे यांनी स्पष्ट केले आहे. तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी कायदेशीर चौकशी सुरू आहे . तथापि, आवश्यकतेनुसार यापुढेही या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाईल. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये शासन भक्कमपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव खालचे येथे पैनगंगा नदीच्या पात्रात स्वाती देविदास कांबळे ,पायल देविदास कांबळे तसेच ममता या 3 मुलींचा मृत्यू 27 मे 2024 रोजी झाला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-1989,...
शासकीय तंत्रनिकेतन येथे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेस सुरुवात -NNL

शासकीय तंत्रनिकेतन येथे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेस सुरुवात -NNL

नांदेड
नांदेड| तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राज्यातील पॉलिटेक्निक संस्थामध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबत सविस्तर माहिती https://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज सादर करणे, अभ्यासक्रमाची निवड करणे इत्यादी बाबीसंबंधी सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील सुविधा केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे यासाठी 25 जुन 2024 ही अंतिम तारीख आहे. इयत्ता दहावीनंतर पॉलिटेक्निकचा डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय असुन या क्षेत्...
error: Content is protected !!