नांदेड। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अवघ्या एक महिन्यात भाजपाच्या सक्षम यंत्रणेला धक्का देत जिल्ह्याचे नुतन खा. वसंतराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी पक्ष कार्यालयात भेटी घेतली. खा. चव्हाण यांचे मुंबईत जंगी स्वागत करत अनेकांनी शुभेच्छा वर्षाव केला. लोकसभेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही देशपातळीवरील प्रमुख नेत्यांनी हायटेक सभा नांदेड नायगाव- देगलूर मतदारसंघात घेतल्या मात्र चव्हाणांच्या पाठीशी उभे राहून मतदारांनी कौल देत नांदेडसह मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला एकही जागा मिळू शकली नसल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मविआच्या प्रमुख नेत्यांनी नुतन खा. वसंतराव चव्हाणांचे मुंबईत जोरदार स्वागत केले.


दरम्यान काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना नांदेड उत्तर व नांदेड दक्षिणमधून ४० हजारांपेक्षा अधिक लीड मिळाली. त्यासाठी आ. मोहन हंबर्डे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष हणमंतराव बेटमोगरेकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, अब्दुल सत्तार, नायगावचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बेळगे, माजी सभापती सय्यद रहीम, अभिनेता
अनिल उर्फ एकनाथ मोरे, केदार साळुंखे, दत्तात्रय येवते (मामा हे खा. चव्हाण यांच्यासोबत मविआच्या नेत्यांना भेटले. आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील यश कसे मिळवायचे याचा कानमंत्रही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

महेश देशमुख यांच्या कामाची पावती…
तरोडा बुद्रुक येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या महेश देशमुख यांनी महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेस सोबत आपली निष्ठा कायम ठेवली आहे त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवत काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात थेट राहुल गांधी यांच्याकडून शाबासकीची थाप मिळवली होती त्यांच्या व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी तरुणा बुद्रुक व खुर्द येथील 30 बूथ वरून सूक्ष्म नियोजन करत काँग्रेसला थेट तरोडा बुद्रुक व तरोडा खुर्द येथून मोठ्या मतांची आघाडी कट्टूकट फाईट मध्ये मिळवून देत आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक या ठिकाणी दाखवत वरिष्ठांच्या नजरेमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे..
महेश देशमुख यांनी केले बूथ निहाय कट्टू कट नियोजन..

भारतीय जनता पार्टी ही देशात 400 पार चाणारा देत प्रचारात आघाडीवर असताना काँग्रेसला नांदेड लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची उणीव भासत असताना महेश देशमुख यांनी आपल्या माध्यमातून काँग्रेसवरची निष्ठा कायम राखताना युवक कार्यकर्त्यांची फळी व तंतोतंत असे नियोजन यासह प्रत्येक बुथवर आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी व मतदानासाठी काटेकोर नियोजन करत प्रत्येक बुथवर होणारे मतदान काँग्रेसकडे वळविण्यात त्यांना यश आले त्यांच्या या परिश्रमाचे फलित म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या निकटवर्ती वर्तुळात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
