Homeनांदेडखरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी...

खरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी -NNL

नांदेड/मुंबई, अनिल मादसवार। खरीप हंगाम सन 2023/24 मधिल नुकासनग्रस्त शेतकरी बंधवाना विमा संक्रमित रक्कम तात्काळ देन्यात यावी अशी मागणी आज मंत्रीकृषि मा. ना. श्री धनंजय मुड़े यांची मुंबई येथे भेट घेउन आ. माधवराव पाटिल जवळगावकर यानी निवेदन देऊन केली आहे. मंत्री मोहोदय यांनी दखल घेऊन नांदेड जिल्हाधिकारी याना भ्रमणध्वनीद्वारा संपर्क करुण हा विषय 18 जून रोजी विमा कंपनी सोबत होनार्या बैठकित घेनार असल्याचे सांगुन माहिती पाठवा आश्या सूचना केल्या. उपोषणला बसलेल्या शेतकरी बंधवाना आश्वासन देउन उपोषण सोडवन्यासंबधी विनती करण्यास सांगीतले आहे. यामुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा संरक्षित रक्कम न मिळाल्यामुळे मतदार संघातील शेतकरी बांधव उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील असल्याची दखल घेऊन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच गतवर्षी सोयाबीन, कापूस, तूर, ही पिके अति पावसामुळे वाहून खरडून जावून पूर्णतः शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झालले. तसेच काही पिके सुरूवातीला कमी पावसामुळे करपून गेले आहेत.

एव्हढेच नाहीतर सोयाबीनवर येलो मोझेक नावाच्या व्हायरसमुळे उत्पन्नात ७० ते ८० टक्के पर्यंत सोयाबीन पिकाची घट आली. ही सर्व परिस्थिती बघून आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला मध्य हंगाम प्रतिकृता या सदराखाली २५ टक्के अग्रीम देण्यासाठी अधिसुचना काढलेली आहे. परंतु ३ महिन्याचा कालावधी उलटून सुध्दा कंपनीने अद्यापपर्यंत शेतक-यांना/विमा धारकांना उर्वरित रक्कम दिलेली नाही.

त्यामुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांमध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरोधात जनआक्रोष निर्माण झालेला आहे. तसेच मतदर संघातील शेतकरी बांधव उपोषणास दिनांक ११/०६/२०२४ रोजीपासून तहसिल कार्यालय हदगाव येथे बसले आहेत. तरी शेतकरी बांधवांचे खरीब हंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा संरक्षित रक्कम देणेसंदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीस आदेश व्हावेत अशी विनंती एका निवेदनातुन करण्यात आली आहे.

ही बाब लक्षात घेऊन उपोषण करण्याला बसलेल्या शेतकरी बंधवाना दिलासा द्यावा आणि अधिकारी यांच्यामार्फत धिर देउन त्याना आश्वाशित करुण उपोषण सोडवन्यात यावे अशी विनती आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांनी कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. या मागणीची तात्काळ दखल घेऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments